MB NEWS-सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची थकीत देयके परळी पालिकेने त्वरित द्यावीत-नगरसेवक प्रा.पवन मुंडे

 सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची थकीत देयके परळी पालिकेने त्वरित  द्यावीत-नगरसेवक प्रा.पवन मुंडे

----------------



परळी वैजनाथ, दि.  (प्रतिनिधी)ः-

परळी नगर पालिकेत सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचे पालिकेकडून येणे असलेली विविध देयके त्वरित देवून या कर्मचार्‍यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी केली आहे.

पालिका कार्यालयात दिलेल्या निवेदनात प्रा.मुंडे यांनी ही मागणी केली आहे. आयुष्यभर पालिकेत सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांची सेवानिवृत्तीनंतर परळी पालिका प्रशासनाने हेळसांड लावली आहे. सेवानिवृत्त होवून अनेक महिने जावूनही या कर्मचार्‍यांना पालिकेकडून येणे असलेले भविष्य निर्वाह निधी व इतर देयके वेळेवर दिली जात नाहीत. कर्मचारी सतत यासाठी पालिका कार्यालयात चकरा मारत असतात. गेल्या कांही वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना पालिकेने अद्याप ही देयके दिलेली नाहीत. पालिका प्रशासनाने यात लक्ष घालून ही देयके त्वरित अदा करावीत अशी मागणी प्रा.मुंडे यांनी या निवेदनात केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार