इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-सभापती गोपाळ आंधळे यांच्या पाठपुराव्याला यश न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय

सभापती गोपाळ आंधळे यांच्या पाठपुराव्याला यश 
न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने 
प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय

 
परळी दि. ७(प्रतिनिधी)सध्या परळी शहरात कोरोनांची दुसरी लाट रौद्ररूप घेत असुन दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांनी केले आहे. त्याअनुषंगाने नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी न.प. गटनेते वाल्मिक आण्णा कराड यांच्या कडे प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी केली. त्यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे साहेब यांना सुचना केली. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून या आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्ध पञकाद्वारे केली आहे. 
सध्या परळी शहरात केवळ उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. परंतु शहराची लोकसंख्या लक्षात घेता हे लसीकरण केंद्र वाढवणे गरजेचे होते. आणि उपजिल्हा रुग्णालयात हे केंद्र दुसर्या मजल्यावर असल्यामुळे जेष्ठ नागरिकांना पाय-या चढुन जाणे अवघड झाले होते. त्यामुळे शहरात लसीकरण केंद्र वाढवणे गरजेचे होते. ही बाब न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या निदर्शनास आणून दिली. श्री कराड यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे साहेब यांना प्रभाग क्रमांक पाच मधील खंडोबा मंदिर शेजारी असलेल्या नागरी आरोग्य केंद्रात पुढील आठवड्यापासून येथे कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. यामुळे जुन्या परळी गावभागातील नागरीकांना याचा मोठा फायदा होणार आहे. 
शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी केलेल्या मागणी तात्काळ मार्गी लावल्या बद्दल न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण मोरे साहेब व उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर दिनेश कुरमे साहेब यांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या