MB NEWS-ऐन उन्हाळ्यात वितरण कंपनीचा परळी शहरात विजेचा लपंडाव

 ऐन उन्हाळ्यात वितरण कंपनीचा परळी शहरात विजेचा लपंडाव



परळी : दि 6 अनुप कुसूमकर


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकबाकी व परमिटच्या नावाखाली शहरात विजेचा लपंडाव सुरू केला असून विज ग्राहकांना वेठीस धरले जात आहे.ऐन उन्हाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्व सामान्य नागरिकांसह लहान बालक व वयोवृध्द नागरिकास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.


विज वितरण कंपनी दिवसभरात किती वेळेस लाईट घालवते याचे काही वेळापत्रक राहिलेले नाही. थकबाकीदार ग्राहकांची लाईट कट करण्यासाठी दिवसात 20-25 वेळा लाईट बंद करण्यात येत आहे. विज वितरण कंपनीने वसुलीच्या नावाखाली परमिट घेवून विज कट करतात पण विज कट करण्याचे वेळापत्रक काही केलेले नाही. विज कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक वैतागले गेले आहेत. वितरण कंपनीने विज घालवण्याचे वेळापत्रक तयार करून ग्राहकांसाठी ते वृत्तपत्रात छापली पाहिजे. वितरण कंपनी कार्यालयात एखाद्या ग्राहकाने फोन केला तर तेथील अधिकारी वा कर्मचारी यांनाही लाईट पुरवठा सुरू आहे कि नाही हे माहिती नसते हे विशेष.


गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरात विजेचा लपंडाव सुरू असून ऐन उन्हाळ्यात खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने खंडित वीज पुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना सक्तीच्या वसुलीला सामोरे जावे लागत आहे.वाढीव बिलाच्या तक्रारी असतानाही त्या तक्रारीचे निराकरण न करता थेट सक्तीची वसुली व वीज जोडणी तोडण्याचे काम केले जात आहे. हे अन्यायकारक असून वीज पुरवठा सुरळीत करावा व सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मागील महिन्यात एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरातील नागरिक विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे त्रस्त झालेले आहेत. अनेक नागरिकांच्या वाढीव वीज बिलाबाबत तक्रारी आहेत. या तक्रारींचा निपटारा अद्याप झालेला नाही. त्यातच सक्तीची वसुली केली जात आहे. उन्हाळ्यात नागरिकांना विजेच्या बाबतीत सर्व दृष्टीने कुचंबणा सहन करावी लागत आहे. याबाबत तात्काळ अखंडित वीज पुरवठा करावा अशी मागणी करण्यात सर्व सामान्य वीज ग्राहकाकडून करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !