MB NEWS-भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अभिवाद कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी-मोहन व्हावळे*

 *भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी-मोहन व्हावळे*



 _परळी / प्रतिनिधी_ 


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात  शहर व गावपातळीच्या प्रत्येक कुटुंबात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते.14 एप्रिल हा दिवस बहुजनांना प्रेरणा देणारा दिवस आहे.चालु असलेल्या लाॕकडाऊन मध्ये शिथिलता देऊन बाबांच्या अभिवादन करण्यासाठी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा व प्रत्येक वस्तीत असलेल्या  बौध्द विहारात ध्वजारोहण,पुजापाठ करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी व साहित्य खरेदी करीता किमान दोन दिवस बाजार खुला करावा अशी मागणी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे संपादक मोहन व्हावळे यांनी केली आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घराघरात उत्साहचे वातावरण असते व जयंतीच्या निमित्ताने घराघरात रंगरंगोटी, नवीन कपडे, सजावटीचे सामान, मिठाई, इतर पदार्थांची बनवले जातात त्यामुळे  व्यापार पेठही चालू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढाव्यात अशी विनंती बीड जिल्हाधिकारी यांना केली आहे.निश्चितच आपण जर परवानगी दिली तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तमाम भीम अनुयायी प्रशासनाने सांगितलेल्या  सर्व नियमाच पालन करतील अशी अपेक्षा ही मोहन व्हावळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !