MB NEWS-अगोदरच्या लाॅकडाउननंतर सुट नाहीच: मिनी नाही अंशतः नाही; अत्यावश्यक सेवा वगळून बीड जिल्ह्यात लाॅकडाउनच !

 अगोदरच्या लाॅकडाउननंतर सुट नाहीच: मिनी नाही अंशतः नाही; अत्यावश्यक सेवा वगळून बीड जिल्ह्यात  लाॅकडाउनच 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

          26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात लॉक डाऊन लावल्यानंतर आता राज्य शासनाचा 30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन चा निर्णय आल्याने जिल्हा प्रशासनाने त्याप्रमाणे आदेश काढले आहेत.त्यामुळे बीड जिल्ह्याला अगोदरच्या लाॅकडाउननंतर सुट मिळणार असं वाटत होतं तरी सुट मिळणार नाहीच.  उद्यापासून मेडिकल,किराणा,भाजीपाला अशा अत्यावश्यक सेवा वगळून बीड जिल्ह्यात पुढील २५दिवस लाॅकडाउनच असणार आहे.

             अगोदरच बीड जिल्ह्यात तब्बल दहा दिवसाचा लॉक डाऊन लावण्यात आला.30 मार्च नंतर काहीसा कमी केला गेला,मात्र त्यानंतर 4 एप्रिल रोजी राज्य शासनाने जे आदेश दिले त्यानंतरही जिल्हा प्रशासनाने नवे आदेश न काढता जिल्ह्याचा लॉक डाऊन हटवला जात असल्याचे सांगितले, त्यामुळे बीड जिल्ह्याला राज्याच्या लॉक डाऊन मधून वगळले म्हणून व्यापारी,सामान्य माणूस खुश होता .

पण अवघ्या बारा तासात जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सात वाजता नवे आदेश काढत लाॅकडाउन घोषित केला. प्रशासनाने शनिवार रविवारी संपूर्ण लॉक डाऊन आणि सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक सेवा ज्यात किराणा मेडिकल, भाजीपाला,दूध वगळता इतर दुकाने संपूर्णपणे बंद राहतील,या काळात वैध कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडता येणार नाही म्हणत प्रशासनाने सगळ्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना धक्का दिला आहे .या नव्या आदेशामुळे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातावर पोट असणारे लोक,छोटे व्यापारी ज्यात चष्मा दुकानदार,कॉम्प्युटर,इलेक्ट्रॉनिक,इलेक्ट्रिक,इस्त्री,पार्लर,सलून,हार्डवेअर, कपडा,सिमेंट,स्टील,फर्निचर यासह इतर दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत . सामान्य माणसाच्या हाताचे काम बंद पडणार असून त्याने जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

    दरम्यान रोज नवनवे आदेश व ज्याची भाषा सामान्य माणसाला अधिकच संभ्रमात टाकणारी यामुळे नेमकं काय सुरु काय बंद ,नियम काय हे समजून घेताना नागरीकांना नाकेनउ येतात. रोजच निघणार्या प्रशासकीय आदेश   निदान संभ्रमावस्था करणारे नसावेत.सहज अर्थ लागेल अशी भाषा असावी ज्यामुळे नागरीकांचा गोंधळ उडणार नाही एवढीच एक अपेक्षा नागरीक करत आहेत.

⬛⬛⬛

* काय आहेत आदेश


 ➡️ शासनाने लॉकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन बाबत आदेश काढले असून शनिवार रविवार दवाखाना, मेडिकल व अन्य अत्यावश्यक सेवा वगळता काडेकोड बंद तर सोमवार ते शुक्रवार किराणा दुकान, भाजीपाला दुकान, दुध डेअरी, बेकरी, मिठाई चे दुकान, शेती संबंधीत सेवा, रुग्णालय, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, आरोग्याशी संबंधीत सर्व सेवा सुरु राहणार आहेत. माध्यमांची कार्यालये देखील सुरु राहणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली

➡️ कोरोना संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउनच इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. यावर राज्यभरातुन विरोध होऊ लागल्यानंतर लॉकडाऊन नव्हे तर कठोर निर्बंध अशी भूमिका रविवारी सरकारने घेतली होती. मात्र आता हे कठोर निर्बंध म्हणजे एका अर्थाने लॉकडाऊनच असल्याचे चित्र राज्य सरकारचे निर्देश समोर आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. 30 एप्रिलपर्यंत राज्यात केवळ अत्यावश्यक सुविधाच सुरु राहणार आहेत. इतर सर्व प्रकारचे व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश राज्यसरकारने काढले आहेत. त्यानूसार सर्व जिल्ह्यात ठिकठिकाणच्या जिल्हाधिकार्‍यांनी तसे आदेश काढले आहेत.

 ➡️ *काय राहणार सुरु*

सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायं.8 या वेळेत किराणा दुकान, भाजीपाला दुकान, दुध डेअरी, बेकरी, मिठाई चे दुकान, शेती संबंधीत सेवा, रुग्णालय, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, आरोग्याशी संबंधीत सर्व सेवा सुरु राहणार आहेत. माध्यमांची कार्यालये देखील सुरु राहणार आहेत.

 ➡️ *वाहतूक व्यवस्था मात्र सुरु*

या काळात राज्यातील सर्व प्रकारची खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहेत. यात अ‍ॅटो रिक्षात चालकासह दोन प्रवाश्यांना परवानगी असेल तर चार चाकी वाहनात चालक आणि वाहनाच्या प्रवाशी क्षमतेच्या निम्म्या प्रवाश्यांना प्रवास करता येईल. बसमध्ये केवळ सीटवर बसूनच प्रवास करता येईल. 

 ➡️ *कार्यालये*

बँका, महावितरण, दूरसंचारसेवा, विमा आणि मेडिक्लेम, पाणी पुरवठा ही कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये पूर्णत: बंद राहतील. 

 ➡️ *हॉटेल*

सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत हॉटेलमधून केवळ पार्सल सुविधा सुरु राहिल. शनिवार रविवार या दिवशी हॉटेलमधून परवानाधारक कर्मचार्‍यांमार्फत ग्राहकांना घरपोच सेवा देता येईल. मात्र त्यासाठी संबंधित कर्मचार्‍याकडे कोरोना चाचणीचा अहवाल असणे बंधनकारक राहणार आहे. लॉजींगची सुविधा असलेल्या हॉटेलबाबतीत रेस्टॉरंट आणि बार केवळ हॉटेलमधील प्रवाश्यांसाठीच सुरु असतील. त्या व्यतिरीक्त बार, वाईनशॉप, हॉटेल बंद राहणार आहेत.

 ➡️ *आणखी काय बंद*

सर्व प्रकारची धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, बागा, सार्वजनिक ठिकाणे पूर्णत: बंद राहणार आहेत. सर्व शाळा आणि महाविद्यालये देखील बंद राहणार असून खाजगी कोचिंग क्लासेसही बंद राहणार आहेत. 10 वी 12 वीच्या परिक्षा मात्र यातून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा व्यवस्थीत देता येईल. 

 

➡️ *बांधकामाचे काय*

ज्या ठिकाणी मजूरांना बांधकामावरच राहण्याची सोय असेल अशा ठिकाणची बांधकामे सुरु राहतील. मात्र कुठल्याही परिस्थितीत बांधकामासाठी मजूरांची एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहतूक करता येणार नाही. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !