MB NEWS-लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात !

 लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात !

कायदेभंगाचा गुन्हे दाखल केले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभागी होणार नाहीत- आ.धस

 आष्टी, प्रतिनिधी......

      लाॅकडाऊनच्या विरोधात आ.सुरेश धस मैदानात उतरले आहेत.व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणसाला लाॅकडाऊनचा प्रचंड त्रास होतो.यामुळे लाॅकडाऊनच्या निर्णयाला तीव्र विरोध करत गुन्हे दाखल केले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभागी होणार नाहीत असे आ.धस यांनी सांगितले.

       याबाबत तहसीलदार यांना आ.सुरेश धस यांनी निवेदन दिले.लाॕकडाऊनला आ.सुरेश धस यांनी तीव्र विरोध करत व्यापा-यांसह निवेदन देण्यात आले.सविनय कायदेभंगाचे गुन्हे दाखल झाले तरी व्यापारी लाॅकडाऊनमध्ये सहभाग घेणार नाहीत.व्यापा-यांच्या पाठीशी संपुर्ण ताकदनिशी मी उभा आहे.वेळप्रसंगी माझ्यावरही वेगवेगळे गुन्हे दाखल करा, गुन्ह्यांची मला सवय असल्याचा इशारा आ.सुरेश धस यांनी यावेळी दिला आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!