MB NEWS-बीड जिल्हयात येणाऱ्यांना प्रवेशास मनाई,जिल्हयाच्या सिमा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


बीड जिल्हयात येणाऱ्यांना प्रवेशास मनाई,जिल्हयाच्या सिमा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 दि. 13-3-2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोविड -19 नियत्रंण आणण्यासाठी व त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या लागू करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित करण्यात आलेले आहे.

कोरोना विषाणूचे (कोविड-19) उद्भवणा-या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियत्रंण यासाठी महाराष्ट्र कोविड-19, उपाययोजना नियम 2020 यातील नियम 3 नुसार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषित केलेले आहे आणि त्यांना कार्यक्षेत्रातील कोविड -19 वर नियत्रंण आणण्यासाठी व त्याचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी ते सक्षम असतील.

वरील आदेशाचे पालन न करणारी,उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती,संस्था अथवा समुह यांनी साथरोग  प्रतिबंध कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार गुन्हा केला असे मानन्यात येईल  व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार