MB NEWS-दहावी बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुस्तके तसेच स्टेशनरी दुकानांना परवानगी द्या- अश्विन मोगरकर

 दहावी बारावी  परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुस्तके  तसेच स्टेशनरी दुकानांना परवानगी द्या- अश्विन मोगरकर



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठाअंतर्गत चालू असलेल्या पदवी परीक्षा व एप्रिल अखेर सुरू होणाऱ्या दहावी बारावी च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुस्तकांची दुकाने, तसेच जिल्हा व परळी शहरातील चालू असलेल्या विविध कार्यालय, बँक, शासकीय दवाखाना यांना लागणाऱ्या स्टेशनरी साहित्याची दुकाने उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.


बीड जिल्ह्यात मंगळवार पासून अचानक लॉकडाऊन करून किराणा, दूध व मेडिकल वगळता सर्व दुकाने 30 एप्रिल पर्यंत बंद करण्यात आली. परंतु सध्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठाअंतर्गत पदवी स्तरीय परीक्षा ऑनलाईन बरोबर ऑफलाईन पद्धतीने चालू आहेत. तसेच इयत्ता दहावी व बारावी च्या लेखी परीक्षा एप्रिल अखेर चालू होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके, परीक्षा पॅड, पेन व इतर शैक्षणीक साहित्य लॉकडाऊन मुळे पुस्तके व स्टेशनरी दुकाने बंद असल्यामुळे मिळत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. पेन पॅड नसेल तर परीक्षा तरी कशी द्यायची असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 

तसेच शहरातील चालू असलेल्या शासकीय तसेच काही खाजगी कार्यलय, विविध बँक, शासकीय व खाजगी दवाखाने यासाठी लागणारे दैनंदिन स्टेशनरी साहित्य स्टेशनरी दुकाने बंद असल्यामुळे मिळत नाहीत. दहावी बारावी वगळता इतर विद्यार्थ्यांचे शाळेतून ऑनलाईन क्लासेस चालू आहेत त्या विद्यार्थ्यांनाही अभ्यासा साठी लागणारी पुस्तके, वह्या, पेन व इतर आवश्यक साहित्य न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

पुस्तके व स्टेशनरी साहित्य विक्रीचे दुकाने कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध पाळून उघडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरित आदेश द्यावेत अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार