MB NEWS-लसीकरणाला नागरीकांची गर्दी;परळी शहरात आणखी लसीकरण केंद्र वाढवण्याची गरज दोन लसीकरण केंद्र वाढवा- चंदुलाल बियाणी

 लसीकरणाला नागरीकांची गर्दी;परळी शहरात आणखी लसीकरण केंद्र वाढवण्याची गरज



दोन लसीकरण केंद्र वाढवा- चंदुलाल बियाणी


परळी (प्रतिनिधी-)

परळी शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात यापुर्वीच झाली असून वय वर्ष ४५ च्या पुढील नागरिकांच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा १ एप्रिलपासून सुरु झाला आहे.शहरात शासकीय स्तरावर फक्त उपजिल्हा रुग्णालय येथे लसीकरण होत असून वाढत्या संख्येमुळे लसीकरणावर मर्यादा येत असून यावेळी वाढलेल्या गर्दीमुळे सामाजिक सुरक्षीत अंतर ठेवण्यातसुद्धा अपयश येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात आणखी  लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. दोन ठिकाणी लसीकरण केंद्र वाढवा अशी मागणी आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केले आहे. 

      परळी शहरात लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर  उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीडची लस घेण्यासाठी मोठी गर्दी होतांना दिसत आहे. वाढलेल्या गर्दीत अनेकजण मास्क न लावता रांगेत उभे असतात. तर एकमेकांपासून सुरक्षीत अंतरही ठेवले जात नसल्याचे चित्र पहायला मिळते. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे लस घेत असतांना आपण दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढवत आहोत याचेही भान नागरिक नाईलाजाने ठेवू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील गणेशपार भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व औष्णीक विद्युत केंद्राच्या शक्तीकुंज वसाहत येथे असलेल्या आरोग्य केंद्रात लसीकरण सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन आरोग्य मित्रचे अध्यक्ष चंदुलालाल बियाणी यांनी केले आहे.

एकापेक्षा जास्त ठिकाणी लसीकरण सुविधा असेल तर आरोग्य यंत्रणेवरही अधिकचा ताण पडणार नाही. तसेच नागरिकांच्या गर्दीतून कोरोनाचा प्रसारही होणार नाही याकडेही चंदुलाल बियाणी यांनी लक्ष वेधले आहे. शहरात या दोन्ही ठिकाणी आवश्यक असलेली यंत्रणा तातडीने कार्यान्वित करुन नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे या निवेदनात चंदुलाल बियाणी यांनी म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना देण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार