MB NEWS-ग्राहकांच्या सेवेस पवनराजे बँक पात्र ठरेल- ह. भ .प .केशव महाराज उखळीकर*

 *पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँके चा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा थाटात संपन्न*



*ग्राहकांच्या सेवेस पवनराजे बँक पात्र ठरेल- ह. भ .प . केशव महाराज उखळीकर*


*पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, खा.ओमराजे दादा निंबाळकर, वाल्मीकआन्ना कराड यांनी दिल्या शुभेच्छा*


*परळी वैजनाथ प्रतिनिधी*


परळी शहरात नव्यानेच रुजू झालेल्या पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी ली बँकेचा आज मंगळवार दि 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सुप्रसिद्ध भागवताचार्य ह भ प श्री केशव महाराज उखळीकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.


आज मंगळवार दिनांक 30 मार्च रोजी परळी शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ साई प्रेम आर्कड, शॉप नंबर 3 परळी वैजनाथ येथे पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेचा शुभारंभ सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा भागवताचार्य ह भ प श्री केशव महाराज उखळीकर यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा करून व फित कापून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा. वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह-भ-प श्री रामेश्वर महाराज कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा मधुकर आघाव सर, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष संजय गवळी, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पवन राजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे सर सचिव गोविंद भरबडे ,संचालक श्री.प्रल्हाद काळे ,श्री.रामेश्वर भोसले ,मयूर जिरगे,शत्रुघन भरबडे, गोविंद मुंडे,शेख खाजा ,सौ.वैजंतीमाला घवले,सौ.सोनाली वैराळे,यांनी केले.

दरम्यान बँक उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ह भ प श्री केशव महाराज उखळीकर यांनी आशीर्वचन पर बोलताना म्हणाले की परळी शहरात नव्याने सुरू झालेली पवनराजे मल्टीपर्पज अर्बन निधी बँक परळीकरांच्या विश्वासास पात्र ठरेल, सध्या स्पर्धेचे युग असून अशातही पवनराजे बँकेतील सर्व संचालक मंडळ कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन आपली बँक नावारूपास येण्यासाठी तसेच ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असा विश्वास ह-भ-प श्री केशव महाराज उखळीकर यांनी व्यक्त केला. 


यावेळी बोलताना अभा वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष ह-भ-प श्री रामेश्वर महाराज कोकाटे म्हणाले की पवनराजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँक तळागाळातील उपेक्षितांना अर्थकारणाची नवीन दिशा देईल व लवकरच परळी शहरात पवनराजे बँक मोठे नावलौकिक करेल असे सांगितले. दरम्यान आज झालेला उद्घाटन सोहळा कोरोना चे सर्व नियम व अटी पाळून करण्यात आला.

*पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, खा.निंबाळकर व वाल्मिक कराड यांच्यासह मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा*


आज मंगळवारी पवन राजे अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेचा शुभारंभ प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प केशव महाराज उखळीकर यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना धनंजय मुंडे उस्मानाबादचे खासदार ओमराजे दादा निंबाळकर परळी न.प. चे गटनेते वाल्मीक आन्ना कराड यांच्यासह विविध क्षेत्रातील डॉक्टर्स इंजिनिअर्स वकील पत्रकार व्यापारी नागरिक यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन पवनराजे बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार