MB NEWS-कोरोना काळात गर्दी जमवुन लग्न पडले महागात: नवरा- नवरी, पुरोहितासह तीनशे वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल

 कोरोना काळात गर्दी जमवुन लग्न पडले महागात: नवरा- नवरी, पुरोहितासह तीनशे  वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल  

   


 नेकनूर,प्रतिनिधी....

     कोरोना काळात गर्दी जमवुन लग्न समारंभ करणं महागात पडले आहे. राज्यात कोविडविषयक कडक निर्बंध लागू आहेत. जमावबंदी, संचारबंदी लागू आहे.या परिस्थितीत ही गर्दी जमवुन लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रकरणी नवरा- नवरी, पुरोहितासह तीनशे  वऱ्हाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          धारूर आणि पैठण येथील कुटुंबीयांनी  विवाहासाठी  मांजरसुंबा हे  ठिकाण निवडले होते. मांजरसुंबा येथील बीड रोड वर असणाऱ्या कन्हैया लॉन्स या ठिकाणी मोठ्या  प्रमाणात गर्दी झाल्याचे नेकनूर पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. या ठिकाणी धारूर येथील अमित अर्जुन गायकवाड आणि पैठण जिल्हा औरंगाबाद येथील ऋतुजा दिपकराव चव्हाण या दोघांचा विवाह सोहळा होत असल्याने गर्दी दिसून आली. यामुळे साथरोग, आपत्ती व्यवस्थापन आदी कलमाचे उल्लंघन झाल्याने ग्रामसेवक जगदीश कडू यांच्या फिर्यादीवरून नवरा, नवरी, त्यांचे आई-वडील,  मामा , लग्न लावणारे ब्राह्मण,  मॅनेजर यांच्यासह इतर तीनशे लोकावर कलम 188 ,269, 270 भा द वि साथरोग आपत्ती व्यवस्थापन या कलमाखाली नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ए पी आय लक्ष्मण केंद्रे , पीएसआय विलास जाधव, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार