MB NEWS-एक लाख रुपये लाच प्रकरणी परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सपोनिसह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

 एक लाख रुपये लाच प्रकरणी परळी रेल्वे पोलिस ठाण्याच्या सपोनिसह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई



परभणी.......

        अॅट्रासिटीच्या गुन्ह्यामध्ये मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी व कँटीन चालवू देण्यासाठी एका नागरिकाकडून तब्बल 1 लाखाची लाच स्वीकारून रकमेसह रेल्वे पोलिसाने पलायन केले. गंगाखेड येथे आज गुरुवारी दि.25 मार्च रोजी एसीबीने सापळा रचून परळी रेल्वे पोलिस ठाण्यातील सपोनिसह तिघांवर कारवाई केली.

        याबाबत एका 45 वर्षीय तक्रारदाराने तिघांविरोधात लेखी तक्रार अर्ज दिला होता. माधुरी महादेवराव मुंढे (वय 32 वर्षे व्यवसाय- सहायक पोलिस निरीक्षक, शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), संजय त्रंबक भेंडेकर (वय 53 वर्ष, व्यवसाय पोह ब.नं 214 नेमणूक शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ), प्रेमदास दयाराम पवार (वय 37 वर्षे, पोलीस शिपाई ब.नं 567 शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, परळी वैजनाथ) यांचा यात समावेश आहे. 18 मार्चला गंगाखेड येथे रेल्वे पोलिस ठाण्याच्या पार्किंगजजवळ व 20 मार्च रोजी परळी येथे रेल्वे पोलीस ठाण्यात त्या तिघांनी️ 1 लाख रूपये लाच मागितली होती. यातील रेल्वे पोलीस हवालदार संजय त्रंबक भेंडेकर याने तक्रारदाराकडून 1 लाख रुपये स्वीकारले व ही रक्कम घेऊन तो पळून गेला.तक्रारदार यांच्याविरुद्धच्या अट्रोसिटी अर्जामध्ये मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी व त्यांची गंगाखेड रेल्वे स्थानकावरील कँटीन चालवू देण्यासाठी त्या तिघांनी पंचसमक्ष 1 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात गंगाखेड येथे पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चालू होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड विभागाच्या पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ️ पर्यवेक्षण अधिकारी तथा परभणी अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस उपाधीक्षक भरत हुंबे, सापळा पथकातील पोलीस निरीक्षक अमोल कडू, पोना/अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी, शेख मुखीद पोकाॅ/सचिन धबडगे , सारिका टेहरे, चापोना चौधरी यांनी ही कारवाई केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !