पोस्ट्स

MB NEWS-परळीत पोलीसांची संख्या कमी- शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद ; चोरट्यांना मोकळं रान-चोरीच्या घटना वाढल्या

इमेज
  परळीत पोलीसांची संख्या कमी- शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद ; चोरट्यांना मोकळं रान-चोरीच्या घटना वाढल्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        परळी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरावर नजर रहावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही यंत्रणा केवळ शोभेची वस्तू बनली आहे.शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे.सध्या कोरोना काळात शहराची सुरक्षाच एकप्रकारे रामभरोसे झाली आहे.        परळी शहरात प्रमुख चौक, रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या सर्व कॅमेर्‍यांचा नियंत्रण कक्ष शहर ठाण्यात आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरे पुर्णपणे बंद असून ही यंत्रणा धुळखात पडली आहे. गुन्हेगारी रोखण्यासोबत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी असलेली अत्याधुनिक व तेवढीच उपयुक्त यंत्रणा तातडीने पुन्हा कार्यरत होणे गरजेचे आहे. परळी शहरात सुरक्षेच्या दृष्टीने मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केलेली असुन जवळपास ५२ कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.यापैकी बहुतांश सीसीटीव

MB NEWS-दादाहरि वडगाव व परळीच्या मोंढ्यातुन मोटारसायकलींची चोरी

इमेज
  दादाहरि वडगाव व परळीच्या मोंढ्यातुन मोटारसायकलींची चोरी  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        परळीत गुन्हेगारी करणारांना मोकळे रान मिळाले आहे.कोरोनाकाळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाले आहेत.प्रत्येकजण यातूनच जात आहे.मग चोर, चोरटे आणि भुरटे चोर यांचीही प्रचंड विवंचना झालेली आहे त्यामुळे संधी दिसताच डल्ला मारण्यासाठी चोरटे आसुसलेले आहेत.विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकलीही चोरीला गेल्याचे समोर आले आहे.यात काही तक्रारी ही पोलीसांकडे आलेल्या आहेत.दादाहरि वडगाव व परळीच्या मोंढ्यातुन मोटारसायकलींची चोरी झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.         वडगाव दादाहरि येथील फिर्यादी शेख गुलाब शेख अब्बास यांची जुनी वापरती पॅशन प्रो मोटारसायकल क्र.एम एच ४४ एल ९७९८ अज्ञात चोरांनी हॅण्डललाॅक तोडून चोरली.याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर परळीच्या मोंढा परिसरात आयसीआयसी बॅकेसमोर घरासमोर लावलेली फिर्यादी बबन डिगांबर अनारसे यांची मोटारसायकल हॅण्डललाॅक तोडून अज्ञात चोरांनी चोरुन नेली.याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आह

MB NEWS-तळेगाव शिवारातुन मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोराला पकडले

इमेज
  तळेगाव शिवारातुन मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोराला पकडले परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      तालुक्यातील पांगरी कॅम्प तळेगाव शिवारातुन मोटारसायकलची चोरी करताना एका चोराला नागरीकांनी पकडून ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले.याप्रकरणी एका आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील पांगरी कॅम्प तळेगाव शिवारात फिर्यादी उमाकांत माणिकराव मुंडे रा.तळेगाव यांचे घर आहे.घरासमोर त्यांनी आपली मोटारसायकल क्र.एम.एच.४४ डब्ल्यु १६४३ शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल चोरुन घेऊन जात असताना आरोपी दिलीपसिंग तारासिंग टाक या.देगलुर ह.मु.शिवाजीनगर परळी यास पांगरी कॅम्प येथे पकडले.चोरास पकडून ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अधिक तपास पो.ह.शेप हे करीत आहेत.

MB NEWS-धर्मयुद्ध,कौरव-पांडव, आपलं घर, नेतृत्व, संघर्ष, वज्रमूठ, वाघिण अन् पंजा..........! 🌑 रोखठोक पंकजा अन् बेधडक भुमिका: समर्थकांना हेच तर हवय

इमेज
  धर्मयुद्ध,कौरव-पांडव, आपलं घर, नेतृत्व, संघर्ष, वज्रमूठ, वाघिण अन् पंजा..........! 🌑 रोखठोक पंकजा अन् बेधडक भुमिका: समर्थकांना हेच तर हवय  परळी वैजनाथ, प्रतिनिधी......         कुटुंब मोठं झालं की घरकारभार्यांची संख्या ही वाढते.कधीकधी वडिलधाऱ्या आणि घरातील कर्त्यांनी जाणीवपुर्वक किंवा नजर अंदाजाने थोडीशी मोकळीक दिली तर मीच घराचा कारभारी आहे अशा आविर्भावात 'चाडबुटके' ही काही दिवस मिरवतात. काही बाबी स्वतःच्या मनमानी वृत्तीने घडवुनही आणतात. घरात हे चालूनही जातं पण जेंव्हा घराबाहेर, समाजात,पै पाव्हण्यात, बाजारात अमुक अमुक घराचे कारभारी म्हणुन जातात तेंव्हा कळते त्यांना स्वतःची औकात आणि क्षमता. त्यामुळे घरातील जबाबदार व कर्तृत्ववान सदस्य औटघटकेच्या अशा 'फडफडणार्या' न 'वीसावणार्या' कडे दुर्लक्ष करत असतात. घरातील जबाबदार व कर्तृत्ववान कारभारी घर सोडून जाण्याची बालिश भुमिका घेत नसतात तर 'घराचं घरपण' अस्ताव्यस्त झाले असेल तर ते "ताळ्यावर"आणतात.एक प्रकारे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हीच भुमिका विचारपूर्वक

MB NEWS-परळीच्या पोलिस ठाण्यांना हवे आणखी पोलीस कर्मचारी; मनुष्यबळाअभावी कामकाजात मोठी समस्या

इमेज
  परळीच्या पोलिस ठाण्यांना हवे आणखी पोलीस कर्मचारी; मनुष्यबळाअभावी कामकाजात मोठी समस्या  परळी वैजनाथ, प्रतिनिधी..        परळी येथे तीन पोलिस ठाणे आहेत. मात्र या तीनही पोलीस ठाण्याला मनुष्यबळाची कमतरता असल्याने कामकाजात मोठी समस्या निर्माण होत आहे.परळीच्या पोलीस दलात आणखीन अधिकारी व कर्मचारी हवे असून शहर व तालुक्याची व्याप्ती लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ अत्यंत अपुरे असल्याचे समोर आले आहे.         परळी मध्ये एकूण तीन पोलीस ठाणे आहेत. शहर पोलीस ठाणे, संभाजीनगर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाणे परंतु या तीनही ठाण्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे.ग्रामीण पोलीस ठाण्या अंतर्गत जवळपास तालुक्यातील 82 गावं येतात. या ठिकाणी 65 मंजूर पदांची मागणी आहे परंतु सद्यस्थितीला या ठिकाणी केवळ चोवीस कर्मचारी कार्यरत आहेत. शहर पोलिस ठाण्याची अवस्थाही यापेक्षा काही वेगळी नाही. शहर पोलीस ठाण्यात एकूण १३२ पदांची मंजुरी आहे परंतु इथे 49 कर्मचारी कार्यरत आहेत. संभाजीनगर पोलीस ठाण्यात मंजूर पदे 115 असून सद्यस्थितीला केवळ 48 कर्मचारी कार्यरत आहेत.तीन्ही पोलीस ठाण्यात मिळुन तब्बल १९२ पदे रिक्त आहेत.      

MB NEWS-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतरही समर्थकांचे राजीनामासत्र सुरुच....! 🕳️ *कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांचा रासप महासचिवांकडे राजीनामा*

इमेज
  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतरही समर्थकांचे राजीनामासत्र सुरुच....! 🕳️ कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांचा रासप महासचिवांकडे राजीनामा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           केंद्रीय मंत्रिमंडळात खा.डाॅ.प्रितम मुंडे यांचा समावेश करण्यात आला नाही.त्यामुळे मुंडे भगिनी भाजपात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.त्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी स्पष्टपणे आपण नाराज नसल्याचे सांगितले. परंतु त्यानंतरही मुंडे समर्थक मात्र नाराजच आहेत.भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतरही शेकडो लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समर्थकांचे राजीनामासत्र सुरू झाले आहे. यामध्ये आता राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी ही राजीनामे देत आहेत. परळी  तालुक्यातील कन्हेरवाडी चे सरपंच राजेभाऊ फड यांनी पक्षाच्या सहासचिवांकडे आपला राजीनामा दिला आहे.           बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात स्थान दिलेले नाही. तसेच पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्यावर भारतीय जनता पक्षाकडून वारंवार होत असलेला अन्याय आपल्या सारख्या असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहन ह

MB NEWS-गवळी समाजाच्या वतीने ओबीसींचे राजकीय आरक्षण परत द्या मागणीचे निवेदन सादर

इमेज
  गवळी समाजाच्या वतीने ओबीसींचे राजकीय आरक्षण परत द्या मागणीचे निवेदन सादर परळी वैजनाथ ता.१२.....             येथील गवळी समाजाच्या वतीने ओबीसींचे राजकीय आरक्षण परत द्या यासाठी आवश्यक जातीनिहाय जणगणना करा या मागणीसाठी लाक्षणिक निदर्शने येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आली. यावेळी ओबीसींच्या विविध मागण्याचे निवेदन नायबतहसीलदार बाबूराव रुपनर यांना सोमवारी (ता.१२) देण्यात आले.            सुप्रीम कोर्टाने ओबींसीचे राजकीय आरक्षण रद्द केले. यामध्ये राज्य सरकारने जातीनिहाय आवश्यक डाटा सुप्रीम कोर्टात दाखल न केल्याने ओबींसीचे आरक्षण रद्द झाले. राज्य सरकार केंद्र सरकारने हा डाटा आम्हाला दिला नाही म्हणून आम्ही तो दाखल करता आला नाही. असे सांगत आहे. दोन्ही सरकार एकमेकावर ढकलत असल्याने गवळी समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे. याचाच एकभाग म्हणून येथील गवळी समाजाच्या वतीने लाक्षणिक निदर्शने करण्यात आली. निदर्शनानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तहसीलदार मार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन नायबतहसीलदार बाबूराव रुपनर यांनी स्विकारले. यावेळी गवळी समाजाचे अरुण

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज निरंक - जिल्ह्यात १७४ पाॅझिटिव्ह

इमेज
  आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज  निरंक - जिल्ह्यात १७४ पाॅझिटिव्ह परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. गेल्या अनेक दिवसात  बीड जिल्ह्याच्या दैनंदिन covid-19 अहवालात परळी तालुक्यातील संख्या कमी झालेली दिसत आहे. आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०० आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या १७४ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत होती. मात्र आज  परळी तालुक्याची संख्या निरंक आहे.  कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-_उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त_ *15 जुलै ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेआरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन*

इमेज
  _उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त_ *15 जुलै ते 22 जुलै  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन* *परळी वैजनाथ, प्रतिनिधी....           राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै दरम्यान अबालवृद्ध बंधु भगिनींकरीता विविध लोकोपयोगी उपक्रम आयोजित केले जातात. यापूर्वी "आधार महोत्सव","स्वाभिमान महोत्सव" तसेच लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन "सेवासप्ताह" घेण्यात आला.यावर्षी 15 जुलै ते 22 जुलै  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेआरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.             यावर्षी सर्वांनी कोरोनाच्या प्रादुर्भावात दुसऱ्या लाटेत अतिशय बिकट परिस्थीतीचा सामना केला.अनेक जीवाभावाची व्यक्तीमत्वे कोरोनाने आपल्यापासून दुरावून नेली.विद्यमान परिस्थितिमध्ये देखील अनेकजण दवाखान्यात उपचारार्थ जावू शकत नाहीत,ही बिकट परिस्थिती आहे.त्यामुळे दोन्ही लाडक्या नेत्यांचा व

MB NEWS-परळीत अवैध कत्तलखान्यात डांबुन ठेवलेल्या १२ गाईंची पोलीसांच्या सहाय्याने गोप्रेमींनी केली सुटका !

इमेज
  परळीत अवैध कत्तलखान्यात डांबुन ठेवलेल्या १२ गाईंची पोलीसांच्या सहाय्याने गोप्रेमींनी केली सुटका ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी......       कत्तल करण्यासाठी म्हणून परळीच्या बरकतनगर भागातील एका अवैध कत्तलखान्यात डांबुन ठेवलेल्या १२ गाईंची पोलीसांच्या सहाय्याने गोप्रेमींनी  सुटका केली आहे. दि.११ रोजी कत्तल करण्यासाठी म्हणून गाई डांबुन ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पाऊले उचलत संभाजीनगर पोलीसांनी तत्परतेने कर्तव्य बजावले व या गोमातांना जीवदान दिले. या गाई अंबाजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.        याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.११ रोजी परळीच्या बरकतनगर भागातील एका अवैध कत्तलखान्यात अज्ञात आरोपींनी कत्तल करण्यासाठी म्हणून १२ गाई डांबुन ठेवल्याची माहिती फिर्यादी शिवाजी संतराम दहिफळे महाराज रा. दत्तगड अस्वलंबा यांना मिळाली. त्यांनी ही बाब काही सामाजिक कार्यकर्ते व गोप्रेमींना दिली.त्यानंतर संभाजीनगर पोलीस ठाण्यात स.पोलिस निरीक्षक पालवे यांना माहिती दिली असता तातडीने एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले.बरकतनगर भागातील एका अवैध कत्तलखान्यात डांबुन ठेवलेल्या

MB NEWS-समर्थकांचे 'ना'राजीनामा सत्र :भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्लीत दाखल; जे.पी.नड्डा करणार चर्चा* ⬛ पक्षश्रेष्ठींनी बोलावणं धाडलं- सविस्तर होणार चर्चा

इमेज
  समर्थकांचे 'ना'राजीनामा सत्र :भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्लीत दाखल; जे.पी.नड्डा करणार चर्चा* ⬛ पक्षश्रेष्ठींनी बोलावणं धाडलं- सविस्तर होणार चर्चा परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर समर्थकांनी असंतोष व्यक्त केला.भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतरही समर्थकांचे'ना'राजीनामा सत्र सुरूच आहे.शेकडो पदाधिकारी यांनी आपले राजीनामे दिले आहेत.या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी बोलावणं धाडलं असुन भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या आहेत.भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी चर्चा होणार आहे.    खा. डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने मुंडे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत. दोन दिवसात लहान मोठ्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सोपवला आहे. भाजपा पक्ष उभारणीत दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंकजा आणि खा. डॉ. प्रीतम मुंडे पक्षासाठी योगदान देत आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यभरा

MB NEWS-परळीतील चार बालके रेल्वेत प्रवास करतांना औरंगाबाद आरपीएफ ने घेतले ताब्यात 🌑 परळीहून पालकांच्या अपरोक्ष बसले होते शिर्डी एक्स्प्रेसमध्ये ; बालसुधारगृहात केली व्यवस्था

इमेज
  परळीतील चार बालके रेल्वेत प्रवास करतांना औरंगाबाद आरपीएफ ने घेतले ताब्यात  🌑 परळीहून पालकांच्या अपरोक्ष बसले होते शिर्डी एक्स्प्रेसमध्ये ; बालसुधारगृहात केली व्यवस्था  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....,       परळीतील चार बालके पालकांच्या अपरोक्ष रेल्वेत प्रवास करतांना औरंगाबाद आरपीएफने ताब्यात घेतले आहेत. या बालकांचे संरक्षण व काळजी घेण्याच्या दृष्टीने बालसुधारगृहात व्यवस्था करण्यात आली आहे.       याबाबत रेल्वे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काकीनाडा- साईनगर शिर्डी एक्स्प्रेस परळी रेल्वे स्थानकातुन मध्यरात्री १२ वा.सुमारास निघते. दि.९ रोजी परळी रेल्वे स्थानकाजवळील शिवाजी नगर या भागातील चार मुले परळीहून पालकांच्या अपरोक्ष शिर्डी एक्स्प्रेसमध्ये बसले.घरातुन निघुन ही मुले का गेली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या चार मुलांनी परळी ते जालना प्रवास करतांना जालना येथे रेल्वे सुरक्षा बलाच्या एका कर्मचाऱ्याने ही मुले एकटीच असल्याचे लक्षात आल्यावरुन या मुलांना ताब्यात घेतले. औरंगाबादमध्ये उतरवुन आरपीएफ कार्यालयात नेण्यात आले.या मुलांची चौकशी केली असता ही चारही मुले परळीची असल्याचे लक्षात आ

MB NEWS-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतरही समर्थकांचे राजीनामासत्र* 🕳️ *_परळी भाजप तालुकाध्यक्ष सतिष मुंडेंचा राजीनामा_

इमेज
 * भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतरही समर्थकांचे राजीनामासत्र* 🕳️ *_परळी भाजप तालुकाध्यक्ष सतिष मुंडेंचा राजीनामा_ * परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    केंद्रीय मंत्रिमंडळात खा.डाॅ.प्रितम मुंडे यांचा समावेश करण्यात आला नाही.त्यामुळे मुंडे भगिनी भाजपात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.त्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी स्पष्टपणे आपण नाराज नसल्याचे सांगितले. परंतु त्यानंतरही मुंडे समर्थक मात्र नाराजच आहेत.भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतरही समर्थकांचे राजीनामासत्र सुरू झाले आहे. यामध्ये परळी भाजप तालुकाध्यक्ष सतिष मुंडे यांनी जिल्हा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.

MB NEWS-जळगव्हाण ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात सरपंच, उपसरपंच सदस्य सह शेकडो कार्यकर्त्यांचा ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

इमेज
  जळगव्हाण ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात सरपंच, उपसरपंच सदस्य सह शेकडो कार्यकर्त्यांचा ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश परळी वै. दि.१० प्रतिनिधीः-परळी मतदारसंघातील जळगव्हाण येथील सरपंच- संतराम राठोड, उपसरपंच-कैलास जाधव यांनी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी मध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेली जळगव्हाण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज जगमित्र कार्यालय येथे राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी मध्ये प्रवेश केला. तर भाजप पक्षाला सोड चिठ्ठी देत राम-राम ठोकला. यावेळी न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड, रा.कॉ. तालुका अध्यक्ष लक्ष्मण पौळ, संजय गांधी निराधार समितीचे चेअरमन राजाभाऊ पौळ, माजलगाव कारखाना संचालक प्रभाकरराव पौळ, माधवराव नायबळ सरपंच जयगाव, रामेश्वर कोकाटे सरपंच संगम, शंकर कापसे, सुरेश नानवटे आदी उपस्थित होते. ना.धनंजय मुंडे यांनी सरपंच-संतराम राठोड, उपसरपंच-कैला

MB NEWS-*धनंजय मुंडे आज 6 वाजता live*.....

इमेज
  *धनंजय मुंडे आज 6 वाजता live*..... राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्रवादी चर्चा' या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री धनंजय मुंडे हे आज सायंकाळी सहा वाजता पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेज वरून लाईव्ह संवाद साधणार आहेत या संवादात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर जॉईन करा  https://www.facebook.com/NCPSpeaks/

MB NEWS- *मोटारसायकलचा अपघात होऊन दोन जण जखमी ; पं.स.उपसभापती जानिमियाॅं कुरेशींचे तात्काळ मदतकार्य*

इमेज
 *मोटारसायकलचा अपघात  होऊन दोन जण जखमी   पं.स.उपसभापती जानिमियाॅं कुरेशींचे तात्काळ मदतकार्य* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....     ‌ मोटारसायकल वरून जात असताना टोकवाडी जवळ रात्री ९ वा.सुमारास अपघात  होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.जखमींना पंचायत समिती उपसभापती जानिमियाॅं कुरेशी यांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.      खड्डे चुकवत असताना समोरून आलेल्या स्कार्पियोची धडक बसून मोटारसायकल चा अपघात झाला.यामध्ये मोटारसायकलस्वार इरफान शेख व अल्लाउद्दिन शेख हे दोघे जखमी झाले आहेत.पंचायत समिती उपसभापती जानिमियाॅं कुरेशी यांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MB NEWS-पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत रोषणाई टोकवाडी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांनी 57 हजारोंचे वीजबिल भरले परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांनी वाढदिवस साजरा करत असताना आपल्याच गावातील विद्यादान देणाऱ्या दालनाची रोषनाई करण्याचे काम केले आहे. थकीत विजबिलामुळे अंधारात असलेल्या शाळेला रोषनाई देत जिल्हा परिषद शाळेची ५७ हजाराचे विजबिल सभापती बालाजी मुंडे यांनी भरले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपनही केले आहे. परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवार दि.09 जुलै रोजी त्यांचे मुळगाव असलेल्या टोकवाडी येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजाराम मुंडे, सरपंच सौ.गोदावरी राजाराम मुंडे, महावितरणचे देवकर, ग्रामसेवक क्षीरसागर मँडम, उपसरपंच सुरेश रोडे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम काळे, नामदेव मुंडे, सुनील मुंडे, लहुदास मुंडे, माधवराव मुंडे, मदन काळे, आश्रोबा काळे, भानुदास मुंडे, गंपू पारधे, व सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व कर्मचारी, व ग्रामपंचायत सर्व सदस्य व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सभापती बालाजी मुंडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. राजाराम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील परिसरात हायमास्ट बसविण्यात आले आहेत. टोकवाडी येथे सभापती बालाजी मुंडे व डॉ. राजाराम मुंडे यांचे दोघांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्यांच्या दोघांच्याही कामाचे कौतुकास्पद आहे. परंतू केवळ सत्कार न घेता बालाजी मुंडे यांनी टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या थकलेल्या विजबिलामुळे अंधारात असलेल्या शाळेला रोषनाई देण्याचे काम केले. तब्बल ५७ हजार रूपयाचे थकीत विजबिल बालाजी मुंडे यांनी भरून ज्ञान दान देणाऱ्या दालनाला रोषनाई देण्याचे काम केले. एवढेच नव्हेतर वृक्षारोपन करून पर्यावरणाचे संगोपन करण्याचा देखील त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने प्रयत्न केला. त्यांच्या या चांगल्या कामाचे कौतूक गावकऱ्यांनी करत बालाजी मुंडे व त्यांच्या पत्नीचा जोरदार सत्कार करत त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक केले. यावेळी गावकऱ्यांसोबत बोलताना बालाजी मुंडे म्हणाले की, मी माझ्या गावाच्या विकासासाठी आणि गावकऱ्यांच्या चांगल्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहिल. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला भरभरून निधी आला असून तो निधी सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी खर्च करण्यास पंचायत समितीच्या मार्फत मी सदैव तत्पर राहिल, माझ्या गावात माझा झालेला सत्कार हा मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही असे भावनिक उद्गारही त्यांनी यावेळी काढले.

इमेज
  पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत रोषणाई  टोकवाडी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण  पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांनी 57 हजारांचे वीजबिल भरले परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांनी वाढदिवस साजरा करत असताना आपल्याच गावातील विद्यादान देणाऱ्या दालनाची रोषनाई करण्याचे काम केले आहे. थकीत विजबिलामुळे अंधारात असलेल्या शाळेला रोषनाई देत जिल्हा परिषद शाळेची ५७ हजाराचे विजबिल सभापती बालाजी मुंडे यांनी भरले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपनही केले आहे. परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवार दि.09 जुलै रोजी त्यांचे मुळगाव असलेल्या टोकवाडी येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजाराम मुंडे, सरपंच सौ.गोदावरी राजाराम मुंडे, महावितरणचे देवकर, ग्रामसेवक क्षीरसागर मँडम, उपसरपंच सुरेश रोडे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम काळे, नामदेव मुंडे, सुनील मुंडे, लहुदास मुंडे, माधवराव मुंडे, मदन काळे, आश्रोबा काळे, भानुदास मुंडे, गंपू पारधे, व सर्व जिल्हा परिषद शाळे

MB NEWS-परळी वकील संघातर्फे ॲड.दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार

इमेज
  परळी वकील संघातर्फे ॲड.दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार   परळी वैजनाथ (प्रतिनिधी)येथील विधज्ञ दत्तात्रय आंधळे याची बहुभाषिक भाऊ -बाबा वंजारी महासंघाचे मराठवाडा विभागाचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली असून त्यांचा सत्कार परळी वकील संघाचे वतीने करण्यात आला .            दिनांक९जुलै २०२१रोजी वकील संघात परली वकील संघाचे अध्यक्ष अँड प्रभाकर सातभाई,सचिव अँड उषा दौंड ,अँड धोंडीरामजी उजगरे,अँड त्रिंबक गोलेर,अँड एल.पी.आघाव,अँड राहुल सोलंके,अँड संजयरोडे,अँड सायसराव मुंडे,अँड अश्वीन सालवे,अँड गोविंद मुंडे आदि सर्व सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार अँड प्रदिप गिराम यांनी केले.

MB NEWS- *मी राजकारणात व्यवसाय म्हणून नव्हे तर व्रत म्हणून आले - पंकजाताई मुंडे* *आम्ही नाराज नाही, चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या*

इमेज
 *मी राजकारणात व्यवसाय म्हणून नव्हे तर व्रत म्हणून आले - पंकजाताई मुंडे* *आम्ही नाराज नाही, चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या* मुंबई ।दिनांक ०९।  मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही, तर व्रत म्हणून आले आहे. भाजपला मला संपवायच असं मला वाटत नाही. मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही, चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या. मी पक्षावर निष्ठा ठेवणारी कार्यकर्ती आहे असं म्हणत  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या सर्व मंत्र्यांचे देखील त्यांनी यावेळी अभिनंदन केले. भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकारांशी वार्तालाप केला. विचारलेल्या प्रश्नांवर बोलतांना त्या म्हणाल्या की, केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढलं होतं. त्यांनी मला तिकीटाचे फोटोही पाठवले होते, म्हणून आम्ही मुंबईतच असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतंही प

MB NEWS-मुंडे भगिनींची नाराजी नाही -पंकजाताई मुंडे यांनी केले स्पष्ट: "बोली'अन् "देहबोली" काय संदेश देते?

इमेज
  मुंडे भगिनींची नाराजी नाही -पंकजाताई मुंडे यांनी केले स्पष्ट: "बोली'अन् "देहबोली" काय संदेश देते?   परळी वैजनाथ, प्रतिनिधी,....        मुंडे भगिनी भाजपात नाराज असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू झाली.केंद्रीय मंत्रिमंडळात खा.डाॅ. प्रितम मुंडे यांच्या समावेशावरुन महाराष्ट्रातील राजकीय पटलावर चर्चा सुरू झाल्या.मुंडे समर्थकांनी सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.अनेकांनी अनेक प्रकारचे राजकीय विश्लेषण केले.मत मतांतरे झाली.ताईंनी काय करावे याचे अनेक पर्याय मांडले. अखेर या सर्व पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाला विराम दिला.मुंडे भगिनींची नाराजी नाही एवढंच  स्पष्ट करणारी ही पत्रकार परिषद होती. परंतु या पत्रकार परिषदेत राजकीय नेता म्हणून पंकजाताईंची "बोली" दिसुन आली मात्र त्यांची "देहबोली" नेमका काय संदेश देऊन गेली हे ताईंच्या निकटवर्तीय व व्यक्तीमत्त्वाचा पुर्ण परिचय असलेल्या प्रत्येकाला समजलं नसेल तरच नवल.         📌 *भाजपमध्ये राष्ट्रप्रथम,द्वितीय पक्ष आणि तृतीय मी असं आ

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज ०१ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात १४८

इमेज
  आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज ०१ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात १४८ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. गेल्या अनेक दिवसात  बीड जिल्ह्याच्या दैनंदिन covid-19 अहवालात परळी तालुक्यातील संख्या कमी झालेली दिसत आहे. आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०१ आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या१४८ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत होती. मात्र आज  परळी तालुक्याची संख्या ०१ आहे.  कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

MB NEWS-लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरिक संबंध;अट्राॅसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल 🌑 आधी लाॅजवर नंतर स्वतंत्र रुम करुन ठेवले शेवटी जातीवरुन शिवीगाळ व मारहाण करून निघुन गेला

इमेज
  लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरिक संबंध; अट्राॅसिटी सह बलात्काराचा गुन्हा दाखल 🌑 आधी लाॅजवर नंतर स्वतंत्र रुम करुन ठेवले शेवटी जातीवरुन शिवीगाळ व मारहाण करून निघुन गेला परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......        एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करुन अत्याचार व जातीवरुन शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी संभाजी नगर पोलीस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.बलात्काराच्या या घटनेने खळबळ उडाली आहे.        याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी १५ वर्षीय मुलीची आरोपी जनक यादव(पुर्ण नाव माहीत नाही) रा.दादाहरी वडगाव याच्याशी ओळख झाली. ही ओळख वाढवून त्याने जवळीक निर्माण केली. लग्नाचे आमिष दाखवून दि.२०/६/२१ रोजी परळी शहरातील एका लाॅजवर घेऊन गेला व शारीरिक संबंध प्रस्थापित केले.त्यानंतर वारंवार सलगी केली.तसेच कंडक्टर काॅलनीत स्वतंत्र रुम किरायाने घेऊन त्याठिकाणी राहायला नेऊन ठेवले.सर्व संसारोपयोगी साहित्य घेऊन देऊन पती पत्नी सारखे वेगळे ठेऊन वारंवार शारीरिक अत्याचार केले. दि.४/७/२१ रोजी त्याने येऊन जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून

MB NEWS- *बालासाहेब रामभाऊ मिसाळ यांचे निधन*

इमेज
 *बालासाहेब रामभाऊ मिसाळ यांचे निधन* परळी,(प्रतिनिधी):-बालासाहेब रामभाऊ मिसाळ यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. दि.7 जुलै 2021 रोजी पहाटे 4 वा. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मामा या टोपण नावाने त्याची सर्वत्र ओळख होती. मृत्युसमयी त्यांचे वय 50 वर्ष होते. देवराव (बाबूशा) कदम यांचे ते मामा होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,सुना, दोन भाऊ, दोन बहिनी, नातवंडे असा परिवार आहे.आज दि.7 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 वा. परळी येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे त्याच्या पार्थिवदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मिसाळ कुटुंबीय आवर कोसळलेल्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS- *खा.डाॅ. प्रितम मुंडे मुंबईतच ; दिल्लीत दाखल झाल्याचे वृत्त चुकीचे -पंकजाताई मुंडे यांनी केले ट्विट*

इमेज
 *खा.डाॅ. प्रितम मुंडे मुंबईतच ! 🌑 दिल्लीत दाखल झाल्याचे वृत्त चुकीचे -पंकजाताई मुंडे यांनी केले ट्विट* परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     आज संध्याकाळी ६वा.दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे.या अनुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश ? याबाबत विविध बातम्या येत आहेत.संभाव्य मंत्री दिल्लीत दाखल झाल्याचे वृत्त येत आहेत.यामध्ये " दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होण्याची चिन्हं आहेत. प्रीतम मुंडे यादेखील पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत." अशा प्रकारे वृत्त प्रसारित होत आहे.      दरम्यान भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी काही वेळापुर्वीच एक ट्विट केले असुन खा.डाॅ. प्रितम मुंडे मुंबईतच असल्याचे स्पष्ट केले आहे. पंकजाताई मुंडे यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की,'खासदार प्रितम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः:पाहिली ती बातमी चुकीची व खोटी आहे.मी प्रितमताई सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत.

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज ०२ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात १८८

इमेज
  आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज ०२ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात १८८ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. गेल्या अनेक दिवसात  बीड जिल्ह्याच्या दैनंदिन covid-19 अहवालात परळी तालुक्यातील संख्या कमी झालेली दिसत आहे. आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०२ आहे.                    आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या१८८ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत होती. मात्र आज  परळी तालुक्याची संख्या ०२ आहे.  कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.