MB NEWS-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतरही समर्थकांचे राजीनामासत्र सुरुच....! 🕳️ *कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांचा रासप महासचिवांकडे राजीनामा*

 भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतरही समर्थकांचे राजीनामासत्र सुरुच....!

🕳️ कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांचा रासप महासचिवांकडे राजीनामा


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

          केंद्रीय मंत्रिमंडळात खा.डाॅ.प्रितम मुंडे यांचा समावेश करण्यात आला नाही.त्यामुळे मुंडे भगिनी भाजपात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.त्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी स्पष्टपणे आपण नाराज नसल्याचे सांगितले. परंतु त्यानंतरही मुंडे समर्थक मात्र नाराजच आहेत.भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्पष्टीकरणानंतरही शेकडो लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व समर्थकांचे राजीनामासत्र सुरू झाले आहे. यामध्ये आता राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी ही राजीनामे देत आहेत. परळी  तालुक्यातील कन्हेरवाडी चे सरपंच राजेभाऊ फड यांनी पक्षाच्या सहासचिवांकडे आपला राजीनामा दिला आहे.

          बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात स्थान दिलेले नाही. तसेच पंकजाताई मुंडे व खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्यावर भारतीय जनता पक्षाकडून वारंवार होत असलेला अन्याय आपल्या सारख्या असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहन होणारा नाही त्या मुळे आज मी कनेरवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच पदाचा राजीनामा देत असल्याचे सरपंच राजेभाऊ फड यांनी सांगितले. दरम्यान रासपचे  मुख्य महासचिव बाळासाहेब दोलतडे यांच्याकडे राजीनामा देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !