युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- *मी राजकारणात व्यवसाय म्हणून नव्हे तर व्रत म्हणून आले - पंकजाताई मुंडे* *आम्ही नाराज नाही, चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या*

 *मी राजकारणात व्यवसाय म्हणून नव्हे तर व्रत म्हणून आले - पंकजाताई मुंडे*



*आम्ही नाराज नाही, चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या*


मुंबई ।दिनांक ०९। 

मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही, तर व्रत म्हणून आले आहे. भाजपला मला संपवायच असं मला वाटत नाही. मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही, चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या. मी पक्षावर निष्ठा ठेवणारी कार्यकर्ती आहे असं म्हणत  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या सर्व मंत्र्यांचे देखील त्यांनी यावेळी अभिनंदन केले.


भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकारांशी वार्तालाप केला. विचारलेल्या प्रश्नांवर बोलतांना त्या म्हणाल्या की, केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी तिकीटही काढलं होतं. त्यांनी मला तिकीटाचे फोटोही पाठवले होते, म्हणून आम्ही मुंबईतच असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर आम्ही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आमच्या नाराज असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतंही पद द्यायचं असेल तर मुंडे कुटुंबाचं नाव चालतं. त्यामुळे आमचं नाव चाललं. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती.


भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. त्यानुसार घेतले जातात. सर्वच राज्यांच्या बाबतीत असे निर्णय घेतले आहेत. केवळ प्रीतम यांचंच नाही तर हिना गावित यांचं नावही चर्चेत होतं. पण नवीन लोकांना संधी देण्यात आली. त्यावर हरकत नाही. त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. म्हणूनच त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे, असं सांगतानाच प्रीतम ताईंचं नाव चर्चेत होतं आणि योग्य होतं. पण आता या चर्चांना विराम दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी मंत्र्यांचं अभिनंदन का केलं नाही याचंही कारण सांगितलं. परवा केवळ संभाव्य मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठोस काही येत नव्हतं. त्यामुळे मी कुणाचंही अभिनंदन केलं नाही. मात्र, आता मी केंद्रीय मंत्र्यांचं अभिनंदन करते. राज्यातून मंत्री झालेल्यांचंही अभिनंदन करते, असं त्या म्हणाल्या. मी भारती पवार आणि कपिल पाटील यांच्याशीही मी फोनवरून चर्चा केली. त्यांचं अभिनंदन केलं. तसेच भागवत कराड यांनी मला रात्री साडेबारा वाजता फोन केला होता. त्यांना दिल्लीतून फोन आल्याचं आणि दिल्लीला जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असंही त्यांनी सांगितलं. 


वंजारी समाजातून कोणी नेता पुढे जात असेल तर त्याच्या पाठिशी मी उभा राहणार आहे. मी खूप भाग्यवान आहे. मुंडे साहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले. पायाला फोड आलेले असतांनाही पट्टया बांधून प्रचार केला हे विसरून चालणार नाही असे सांगतांना मुंडे साहेबांच्या आठवणीने त्या गहिवरून गेल्या. नेता महाराष्ट्राचा असतो, तो कोणत्या जातीचा नसतो त्यामुळे ओबीसीचा नेता असं म्हणणं बोलणं योग्य नाही असंही त्यांनी एका प्रश्नांवर बोलतांना सांगितलं.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या