MB NEWS-धर्मयुद्ध,कौरव-पांडव, आपलं घर, नेतृत्व, संघर्ष, वज्रमूठ, वाघिण अन् पंजा..........! 🌑 रोखठोक पंकजा अन् बेधडक भुमिका: समर्थकांना हेच तर हवय
धर्मयुद्ध,कौरव-पांडव, आपलं घर, नेतृत्व, संघर्ष, वज्रमूठ, वाघिण अन् पंजा..........!
🌑 रोखठोक पंकजा अन् बेधडक भुमिका: समर्थकांना हेच तर हवय
परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
कुटुंब मोठं झालं की घरकारभार्यांची संख्या ही वाढते.कधीकधी वडिलधाऱ्या आणि घरातील कर्त्यांनी जाणीवपुर्वक किंवा नजर अंदाजाने थोडीशी मोकळीक दिली तर मीच घराचा कारभारी आहे अशा आविर्भावात 'चाडबुटके' ही काही दिवस मिरवतात. काही बाबी स्वतःच्या मनमानी वृत्तीने घडवुनही आणतात. घरात हे चालूनही जातं पण जेंव्हा घराबाहेर, समाजात,पै पाव्हण्यात, बाजारात अमुक अमुक घराचे कारभारी म्हणुन जातात तेंव्हा कळते त्यांना स्वतःची औकात आणि क्षमता. त्यामुळे घरातील जबाबदार व कर्तृत्ववान सदस्य औटघटकेच्या अशा 'फडफडणार्या' न 'वीसावणार्या' कडे दुर्लक्ष करत असतात. घरातील जबाबदार व कर्तृत्ववान कारभारी घर सोडून जाण्याची बालिश भुमिका घेत नसतात तर 'घराचं घरपण' अस्ताव्यस्त झाले असेल तर ते "ताळ्यावर"आणतात.एक प्रकारे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हीच भुमिका विचारपूर्वक पार पाडल्याचे दिसुन येते.
९ जुलै रोजी पंकजाताई मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भुमिका मांडली होती. त्यानंतर आम्ही (एमबी न्युज ने) मुंडे भगिनींची नाराजी नाही: "बोली'अन् "देहबोली" काय संदेश देते? या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर घडलेही तसे समर्थकांनी राजीनामासत्र सुरू केले आणि आज पंकजाताई मुंडे यांनी त्यांची समजूत काढली. पंकजा मुंडे आजच्या संवादात जसे म्हणाल्या की तुम्ही न बोलता मला कळतं आणि मी न बोलता तुम्हाला कळतं.हे खरं आहे मुंडे समर्थक व मुंडे कुटुंबाचं तेवढं नातं घट्ट निश्चितच आहे. मुंडे समर्थक आक्रमक व आगतिक लवकर होतात हा नेहमीचा अनुभव आहे. भाजपची ही खुप मोठी ताकद आहे.परंतु पक्षांतर्गत काही गोष्टी गेल्या काही वर्षांपासून पक्षहित विचारात न घेता काही नेते मनमानी वृत्तीने निर्णय घेताना दिसतात त्यामुळे समर्थकांत प्रश्नचिन्ह निर्माण होते व संभ्रम तयार होतो.
आजच्या संवादात रोखठोक पंकजा अन् बेधडक भुमिका बघायला मिळाली. मुंडे समर्थकांना हेच तर हव आहे.आजच्या संवादातील धर्मयुद्ध,कौरव-पांडव, आपलं घर, नेतृत्व, संघर्ष, वज्रमूठ, वाघिण अन् पंजा या संपूर्ण मुद्द्यांतुन पंकजाताई मुंडे यांनी समर्थकांना पुढील वाटचालीची दिशा ही दिली, खडतर प्रवासाचे संकेतही दिले, पक्षनिष्ठा ही मजबुत केली अन् विरोधक-स्पर्धकांना गर्भित इशाराही दिला.त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा चार पावलं मागं घेणारी वाघिण राजकीय पटलावर 'झेप' घेणार हे दिसून येते.काय रणनिती असणार, वाटचाल कशी असणार याची उत्तरे येणारा काळच देणार आहे.
⬛पंकजाताई मुंडे यांच्या संवादातील ठळक मुद्दे.......!
📌 माझा नेता नरेंद्र मोदी,माझा नेता अमित शहा आणि जे.पी.नड्डा - पंकजाताई मुंडे
📌 मी कुणालाच भीत नाही माझ्यावर निर्भय राजकारणाचे संस्कार,आपलं घर आपणच का सोडायचं? ज्या दिवशी छत पडेल तेव्हा बघू - पंकजाताई मुंडे
📌 जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत धर्मयुध्द टाळण्याचा प्रयत्न करणार.धर्मयुद्ध टाळण्यासाठी पांडवानी सुद्धा चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न केला होता,आपणही करू.शेवटी नुकसान कौरवांचेच होणार आहे-पंकजाताई मुंडे
📌 युद्ध जर झालच तर तुमचे सारथी पण मनाने आमच्या बाजूने असतील त्यामुळे विजय धर्म, सत्य, नितीमत्तेचाच होणार हे निश्चित- पंकजाताई मुंडे
📌 आम्हाला पंख नाहीत छाटण्यासाठी,पंजा आहे वाघिणीचा जो वेळेवर कुणिचीही चिरफाड करण्यास सक्षम आहे- पंकजाताई मुंडे
📌 तळागळात जाऊन एक एक माणूस जोडत त्या व्यक्तीला कार्यकर्ता ते नेता बनवले गेले असा हा दीर्घ असलेला इथपर्यंत चा प्रवास करून पक्ष बनवला आहे.तो पक्ष कायम आमचा बाप मुंडे साहेबांचा होता आणि आमच्या बाप असलेल्या मुंडे साहेबांचाच असणार - पंकजाताई मुंडे
📌 लोकांची कामं करण्यासाठी मी राजकारणात,सत्तेची आणि खुर्चीची लालसा मला नाही.कुणालाही संपवून मला राजकारण करायचं नाही- पंकजाताई मुंडे
📌 मला दबाव तंत्र करायचं असेल तर ही ती जागा नाही.ही जागा पुरणार नाही.त्यासाठी वेगळी जागा लागेल- पंकजाताई मुंडे
📌 काल मी दिल्लीत गेले होते.पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली.तुम्ही कार्यकर्त्यांना समजावाल हे त्यांनी सांगितलं.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला झापल्याच्या बातम्या आल्या.मी फटकार खावून तुमच्यापुढे आली असेल असं वाटतं का?- पंकजाताई मुंडे
📌 गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मला केंद्रात मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.तेव्हा मी मंत्रिपद नाकारलं होतं.आता मी पद मागेल का? - पंकजाताई मुंडे
📌 मी माझ्या समाजाच्या मंत्र्यांला अपमानित का करु? लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात आहे.निवडणुकीत अनेक लोक पराभूत झाले.कराड यांचं वय 65 आहे. ते आपल्या समाजाचे आहेत मी त्यांचा अपमान करणार नाही- पंकजाताई मुंडे
📌 लोकांची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले.माझा परिवार सर्व कार्यकर्त्यांचा परिवार आहे.मी कार्यकर्त्यांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही- पंकजाताई मुंडे
.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा