युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-परळीतील चार बालके रेल्वेत प्रवास करतांना औरंगाबाद आरपीएफ ने घेतले ताब्यात 🌑 परळीहून पालकांच्या अपरोक्ष बसले होते शिर्डी एक्स्प्रेसमध्ये ; बालसुधारगृहात केली व्यवस्था

 परळीतील चार बालके रेल्वेत प्रवास करतांना औरंगाबाद आरपीएफ ने घेतले ताब्यात


 🌑 परळीहून पालकांच्या अपरोक्ष बसले होते शिर्डी एक्स्प्रेसमध्ये ; बालसुधारगृहात केली व्यवस्था

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....,

      परळीतील चार बालके पालकांच्या अपरोक्ष रेल्वेत प्रवास करतांना औरंगाबाद आरपीएफने ताब्यात घेतले आहेत. या बालकांचे संरक्षण व काळजी घेण्याच्या दृष्टीने बालसुधारगृहात व्यवस्था करण्यात आली आहे.

      याबाबत रेल्वे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काकीनाडा- साईनगर शिर्डी एक्स्प्रेस परळी रेल्वे स्थानकातुन मध्यरात्री १२ वा.सुमारास निघते. दि.९ रोजी परळी रेल्वे स्थानकाजवळील शिवाजी नगर या भागातील चार मुले परळीहून पालकांच्या अपरोक्ष शिर्डी एक्स्प्रेसमध्ये बसले.घरातुन निघुन ही मुले का गेली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या चार मुलांनी परळी ते जालना प्रवास करतांना जालना येथे रेल्वे सुरक्षा बलाच्या एका कर्मचाऱ्याने ही मुले एकटीच असल्याचे लक्षात आल्यावरुन या मुलांना ताब्यात घेतले. औरंगाबादमध्ये उतरवुन आरपीएफ कार्यालयात नेण्यात आले.या मुलांची चौकशी केली असता ही चारही मुले परळीची असल्याचे लक्षात आले आहे. संजना राम मल्लिकार्जुन बिराजदार वय-१२ वर्षे या.शिवाजीनगर परळी, स्वप्ना राम मल्लिकार्जुन बिराजदार वय-८ वर्षे या.शिवाजीनगर परळी, समर्थ राम मल्लिकार्जुन बिराजदार वय-१० वर्षे या.शिवाजीनगर परळी, कृष्णा श्रीदत्ता वय- १२ वर्षे रा.भोईगल्ली परळी अशी या बालकांची नावे आहेत. रेल्वे पोलिस त्यांच्या पालकांशी संपर्क साधत आहेत. तुर्तास या बालकांची काळजी व संरक्षण दृष्टीने बालसुधारगृहात व्यवस्था करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या