MB NEWS-तळेगाव शिवारातुन मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोराला पकडले

 तळेगाव शिवारातुन मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोराला पकडले



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     तालुक्यातील पांगरी कॅम्प तळेगाव शिवारातुन मोटारसायकलची चोरी करताना एका चोराला नागरीकांनी पकडून ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले.याप्रकरणी एका आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील पांगरी कॅम्प तळेगाव शिवारात फिर्यादी उमाकांत माणिकराव मुंडे रा.तळेगाव यांचे घर आहे.घरासमोर त्यांनी आपली मोटारसायकल क्र.एम.एच.४४ डब्ल्यु १६४३ शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल चोरुन घेऊन जात असताना आरोपी दिलीपसिंग तारासिंग टाक या.देगलुर ह.मु.शिवाजीनगर परळी यास पांगरी कॅम्प येथे पकडले.चोरास पकडून ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अधिक तपास पो.ह.शेप हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !