MB NEWS-गवळी समाजाच्या वतीने ओबीसींचे राजकीय आरक्षण परत द्या मागणीचे निवेदन सादर

 गवळी समाजाच्या वतीने ओबीसींचे राजकीय आरक्षण परत द्या मागणीचे निवेदन सादर



परळी वैजनाथ ता.१२.....

            येथील गवळी समाजाच्या वतीने ओबीसींचे राजकीय आरक्षण परत द्या यासाठी आवश्यक जातीनिहाय जणगणना करा या मागणीसाठी लाक्षणिक निदर्शने येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आली. यावेळी ओबीसींच्या विविध मागण्याचे निवेदन नायबतहसीलदार बाबूराव रुपनर यांना सोमवारी (ता.१२) देण्यात आले.

           सुप्रीम कोर्टाने ओबींसीचे राजकीय आरक्षण रद्द केले. यामध्ये राज्य सरकारने जातीनिहाय आवश्यक डाटा सुप्रीम कोर्टात दाखल न केल्याने ओबींसीचे आरक्षण रद्द झाले. राज्य सरकार केंद्र सरकारने हा डाटा आम्हाला दिला नाही म्हणून आम्ही तो दाखल करता आला नाही. असे सांगत आहे. दोन्ही सरकार एकमेकावर ढकलत असल्याने गवळी समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे. याचाच एकभाग म्हणून येथील गवळी समाजाच्या वतीने लाक्षणिक निदर्शने करण्यात आली. निदर्शनानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तहसीलदार मार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन नायबतहसीलदार बाबूराव रुपनर यांनी स्विकारले. यावेळी गवळी समाजाचे अरुण चिखले, वैजनाथ बागवाले, मुन्ना बागवाले, संभाजी काळे, जगन्नाथ साळूंके, वैजनाथ भास्कर यांच्यासह गवळी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !