युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-मुंडे भगिनींची नाराजी नाही -पंकजाताई मुंडे यांनी केले स्पष्ट: "बोली'अन् "देहबोली" काय संदेश देते?

 मुंडे भगिनींची नाराजी नाही -पंकजाताई मुंडे यांनी केले स्पष्ट: "बोली'अन् "देहबोली" काय संदेश देते? 

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी,....

       मुंडे भगिनी भाजपात नाराज असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू झाली.केंद्रीय मंत्रिमंडळात खा.डाॅ. प्रितम मुंडे यांच्या समावेशावरुन महाराष्ट्रातील राजकीय पटलावर चर्चा सुरू झाल्या.मुंडे समर्थकांनी सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.अनेकांनी अनेक प्रकारचे राजकीय विश्लेषण केले.मत मतांतरे झाली.ताईंनी काय करावे याचे अनेक पर्याय मांडले. अखेर या सर्व पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकरणाला विराम दिला.मुंडे भगिनींची नाराजी नाही एवढंच  स्पष्ट करणारी ही पत्रकार परिषद होती. परंतु या पत्रकार परिषदेत राजकीय नेता म्हणून पंकजाताईंची "बोली" दिसुन आली मात्र त्यांची "देहबोली" नेमका काय संदेश देऊन गेली हे ताईंच्या निकटवर्तीय व व्यक्तीमत्त्वाचा पुर्ण परिचय असलेल्या प्रत्येकाला समजलं नसेल तरच नवल.

       




📌 *भाजपमध्ये राष्ट्रप्रथम,द्वितीय पक्ष आणि तृतीय मी असं आमचं तत्व आहे,आमच्या संस्कृतीला मी पणा मान्य नाही.*


📌 *मी काही केवळ वंजारी समाजाची नेता नाही,तर अठरा पगड जातींच्या सर्व लोकांची मी नेता आहे.*


📌 *प्रीतमताई मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नाही*


📌 *पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांनी कधीच मंत्रिपदाची मागणी केली नव्हती*


📌 *ओबीसी वर्गाला राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होता कामा नये*


*पहा पंकजाताई मुंडे काय म्हणाल्या..... संपूर्ण पत्रकार परिषद 👇🏻

https://fb.watch/6DMBu5SMQD/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या