MB NEWS-जळगव्हाण ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात सरपंच, उपसरपंच सदस्य सह शेकडो कार्यकर्त्यांचा ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

 जळगव्हाण ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात


सरपंच, उपसरपंच सदस्य सह शेकडो कार्यकर्त्यांचा ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश

परळी वै. दि.१० प्रतिनिधीः-परळी मतदारसंघातील जळगव्हाण येथील सरपंच- संतराम राठोड, उपसरपंच-कैलास जाधव यांनी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी मध्ये प्रवेश केला.


भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असलेली जळगव्हाण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज जगमित्र कार्यालय येथे राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी मध्ये प्रवेश केला. तर भाजप पक्षाला सोड चिठ्ठी देत राम-राम ठोकला. यावेळी न.प.गटनेते वाल्मिक आण्णा कराड, रा.कॉ. तालुका अध्यक्ष लक्ष्मण पौळ, संजय गांधी निराधार समितीचे चेअरमन राजाभाऊ पौळ, माजलगाव कारखाना संचालक प्रभाकरराव पौळ, माधवराव नायबळ सरपंच जयगाव, रामेश्वर कोकाटे सरपंच संगम, शंकर कापसे, सुरेश नानवटे आदी उपस्थित होते.


ना.धनंजय मुंडे यांनी सरपंच-संतराम राठोड, उपसरपंच-कैलास जाधव, माजी सरपंच-राजेभाऊ सपकाळ, माजी सरपंच- तुकाराम राठोड, ग्रा.पं.सदस्य अभिमान जाधव, ज्ञानेश्वर सपकाळ, नागनाथ अदत कार्यकर्ते अमोल जाधव, विनोद जाधव, रामराजे जाधव, बद्रीसाहेब जाधव, दत्ता जाधव, नारायण गंधाले, अशोक सोळंके, महादेव जाधव, सुदाम जाधव, बाळासाहेब काकडे, सचिन सोळंके, पप्पु पवार, तुकाराम जाधव, प्रल्हाद गंधाले, अमोल पंडित, भागवत जाधव, वल्लभ सपकाळ, अशोक राठोड, भगवान राठोड, विनायक चव्हाण, वचिष्ठ सपकाळ, विकास राठोड, दत्ता कदम, उत्तम चव्हाण आदी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचा गमजा व पुष्प गुच्छ देवून सत्कार केला व पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नेतृत्वाखाली गावच्या विकासासाठी काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !