MB NEWS-आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज ०२ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात १८८

 आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज ०२ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात १८८



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....


        आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. गेल्या अनेक दिवसात  बीड जिल्ह्याच्या दैनंदिन covid-19 अहवालात परळी तालुक्यातील संख्या कमी झालेली दिसत आहे. आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०२ आहे.   

                आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या१८८ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत होती. मात्र आज  परळी तालुक्याची संख्या ०२ आहे.  कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार