युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS- *खा.डाॅ. प्रितम मुंडे मुंबईतच ; दिल्लीत दाखल झाल्याचे वृत्त चुकीचे -पंकजाताई मुंडे यांनी केले ट्विट*

 *खा.डाॅ. प्रितम मुंडे मुंबईतच !



🌑 दिल्लीत दाखल झाल्याचे वृत्त चुकीचे -पंकजाताई मुंडे यांनी केले ट्विट*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    आज संध्याकाळी ६वा.दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे.या अनुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश ? याबाबत विविध बातम्या येत आहेत.संभाव्य मंत्री दिल्लीत दाखल झाल्याचे वृत्त येत आहेत.यामध्ये " दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होण्याची चिन्हं आहेत. प्रीतम मुंडे यादेखील पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत." अशा प्रकारे वृत्त प्रसारित होत आहे.



     दरम्यान भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी काही वेळापुर्वीच एक ट्विट केले असुन खा.डाॅ. प्रितम मुंडे मुंबईतच असल्याचे स्पष्ट केले आहे. पंकजाताई मुंडे यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की,'खासदार प्रितम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः:पाहिली ती बातमी चुकीची व खोटी आहे.मी प्रितमताई सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या