युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत रोषणाई टोकवाडी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांनी 57 हजारोंचे वीजबिल भरले परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांनी वाढदिवस साजरा करत असताना आपल्याच गावातील विद्यादान देणाऱ्या दालनाची रोषनाई करण्याचे काम केले आहे. थकीत विजबिलामुळे अंधारात असलेल्या शाळेला रोषनाई देत जिल्हा परिषद शाळेची ५७ हजाराचे विजबिल सभापती बालाजी मुंडे यांनी भरले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपनही केले आहे. परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवार दि.09 जुलै रोजी त्यांचे मुळगाव असलेल्या टोकवाडी येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजाराम मुंडे, सरपंच सौ.गोदावरी राजाराम मुंडे, महावितरणचे देवकर, ग्रामसेवक क्षीरसागर मँडम, उपसरपंच सुरेश रोडे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम काळे, नामदेव मुंडे, सुनील मुंडे, लहुदास मुंडे, माधवराव मुंडे, मदन काळे, आश्रोबा काळे, भानुदास मुंडे, गंपू पारधे, व सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व कर्मचारी, व ग्रामपंचायत सर्व सदस्य व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सभापती बालाजी मुंडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. राजाराम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील परिसरात हायमास्ट बसविण्यात आले आहेत. टोकवाडी येथे सभापती बालाजी मुंडे व डॉ. राजाराम मुंडे यांचे दोघांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्यांच्या दोघांच्याही कामाचे कौतुकास्पद आहे. परंतू केवळ सत्कार न घेता बालाजी मुंडे यांनी टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या थकलेल्या विजबिलामुळे अंधारात असलेल्या शाळेला रोषनाई देण्याचे काम केले. तब्बल ५७ हजार रूपयाचे थकीत विजबिल बालाजी मुंडे यांनी भरून ज्ञान दान देणाऱ्या दालनाला रोषनाई देण्याचे काम केले. एवढेच नव्हेतर वृक्षारोपन करून पर्यावरणाचे संगोपन करण्याचा देखील त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने प्रयत्न केला. त्यांच्या या चांगल्या कामाचे कौतूक गावकऱ्यांनी करत बालाजी मुंडे व त्यांच्या पत्नीचा जोरदार सत्कार करत त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक केले. यावेळी गावकऱ्यांसोबत बोलताना बालाजी मुंडे म्हणाले की, मी माझ्या गावाच्या विकासासाठी आणि गावकऱ्यांच्या चांगल्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहिल. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला भरभरून निधी आला असून तो निधी सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी खर्च करण्यास पंचायत समितीच्या मार्फत मी सदैव तत्पर राहिल, माझ्या गावात माझा झालेला सत्कार हा मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही असे भावनिक उद्गारही त्यांनी यावेळी काढले.

 पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत रोषणाई 



टोकवाडी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण 



पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांनी 57 हजारांचे वीजबिल भरले


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांनी वाढदिवस साजरा करत असताना आपल्याच गावातील विद्यादान देणाऱ्या दालनाची रोषनाई करण्याचे काम केले आहे. थकीत विजबिलामुळे अंधारात असलेल्या शाळेला रोषनाई देत जिल्हा परिषद शाळेची ५७ हजाराचे विजबिल सभापती बालाजी मुंडे यांनी भरले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपनही केले आहे.



परळी पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवार दि.09 जुलै रोजी त्यांचे मुळगाव असलेल्या टोकवाडी येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजाराम मुंडे, सरपंच सौ.गोदावरी राजाराम मुंडे, महावितरणचे देवकर, ग्रामसेवक क्षीरसागर मँडम, उपसरपंच सुरेश रोडे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम काळे, नामदेव मुंडे, सुनील मुंडे, लहुदास मुंडे, माधवराव मुंडे, मदन काळे, आश्रोबा काळे, भानुदास मुंडे, गंपू पारधे, व सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व कर्मचारी, व ग्रामपंचायत सर्व सदस्य व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सभापती बालाजी मुंडे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. राजाराम मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील परिसरात हायमास्ट बसविण्यात आले आहेत. टोकवाडी येथे सभापती बालाजी मुंडे व डॉ. राजाराम मुंडे यांचे दोघांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. त्यांच्या दोघांच्याही कामाचे कौतुकास्पद आहे. 

            परंतू केवळ सत्कार न घेता बालाजी मुंडे यांनी टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या थकलेल्या विजबिलामुळे अंधारात असलेल्या शाळेला रोषनाई देण्याचे काम केले. तब्बल ५७ हजार रूपयाचे थकीत विजबिल बालाजी मुंडे यांनी भरून ज्ञान दान देणाऱ्या दालनाला रोषनाई देण्याचे काम केले. एवढेच नव्हेतर वृक्षारोपन करून पर्यावरणाचे संगोपन करण्याचा देखील त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने प्रयत्न केला. त्यांच्या या चांगल्या कामाचे कौतूक गावकऱ्यांनी करत बालाजी मुंडे व त्यांच्या पत्नीचा जोरदार सत्कार करत त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक केले. यावेळी गावकऱ्यांसोबत बोलताना बालाजी मुंडे म्हणाले की, मी माझ्या गावाच्या विकासासाठी आणि गावकऱ्यांच्या चांगल्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहिल. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक कराड यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला भरभरून निधी आला असून तो निधी सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी खर्च करण्यास पंचायत समितीच्या मार्फत मी सदैव तत्पर राहिल, माझ्या गावात माझा झालेला सत्कार हा मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही असे भावनिक उद्गारही त्यांनी यावेळी काढले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या