पोस्ट्स

MB NEWS-पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

इमेज
  पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार  धारूर, प्रतिनिधी....        धारुर शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी धारुर पोलिसात  दोन आरोपी विरुध्द आज 16 फेब्रुवारी सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.          पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत नोंदवलेल्या  माहितीनूसार एका फोटो स्टुडिओत पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेली असता यातील आरोपीने पासपोर्ट फोटो काढून त्या दिवशी न देता फिर्यादीला दुसर्‍यादिवशी  बोलावून घेऊन तिचे इच्छे विरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध केले व ही गोष्ट कोणास सांगितल्यास मी तुझ्या भावाला खल्लास करेल अशी धमकी दिली.तसेच आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादी व दोन्ही आरोपी हे एका दिवशी तिघेजण फोटो स्टुडिओ मध्ये गप्पा मारत बसले असता आरोपी क्रमांक एक हा फोटो काढण्याच्या कामासाठी बाहेर गेला. यावेळी  यातील आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादी सोबत शारीरिक संबंध ठेवले व ही गोष्ट कोणालाही न सांगण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला गु.र.न.22/2022 नुसार धारूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित   मुलीच्या तक्रारीवरून आरोपी मधूर बाल

MB NEWS-धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी बसस्थानकाचे रुपडे बदलणार!

इमेज
  धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी बसस्थानकाचे रुपडे बदलणार!  *बसस्थानक बांधकाम व विकासाचा आराखडा अंतिम करण्यासाठी वास्तू विशारद, वरिष्ठ अधिकारी व स्वतः ना. मुंडे स्थळ पाहणी करून आराखड्यातील बदल सुचवणार* मुंबई (दि. 15) ---- : परळी शहर बस स्थानक बांधकाम व परिसराचा विकास करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून परिवहन विभागाने तयार केलेला आराखडा अंतिम करण्यापूर्वी त्यात बस स्थानकाचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी काही बदल करण्याचे सुचवले आहे.  हे बदल प्रत्यक्ष आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी परिवहन विभागाचे वास्तू विशारद, वरिष्ठ अधिकारी आदींना धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यासाठी पाचारण केले आहे. धनंजय मुंडे हे स्वतः त्यांच्यासोबत बस स्थानकात जाऊन त्यांना अपेक्षित असलेले बदल आराखड्यात सुचवणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत ठरले आहे.  परळी शहर बसस्थानाकाचा सुधारित आराखडा आज मुंबई येथे ना. धनंजय मुंडे यांच्या समोर सादर करण्यात आला. यावेळी परिवहन विभागातील बांधकाम महाव्यवस्थापक भूषण देसाई, वाहतूक महाव्यवस्थापक, स्थापत्य कार्यकारी अभियंता, संब

MB NEWS-संत सेवालाल महाराज हे विज्ञानवादी व दार्शनिक दृष्टीचे संत होते- डॉ व्ही. जे. चव्हाण

इमेज
  संत सेवालाल महाराज हे विज्ञानवादी व दार्शनिक दृष्टीचे संत होते- डॉ व्ही. जे. चव्हाण         परळी, प्रतिनिधी - जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये संत सेवालाल महाराजांची 283 जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी डॉ.व्ही जे चव्हाण यांनी संत सेवालाल महाराज हे विज्ञानवादी  व दार्शनिक दृष्टीचे संत होते असे उद्गार याप्रसंगी व्यक्त केले. संत सेवालाल महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा  नष्ट करण्याचा प्रयत्न केला.  बंजारा समाज निरक्षर असल्याने महाराजांनी लाेकगीत, भजन लडीच्या माध्यमातून प्रबाेधन केले. त्या काळी समाजाला भजनाची आवड हाेती. हे ओळखून त्यांनी बंजारा बाेलीभाषेत लडी, भजन रचना करून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून आणले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी व्ही मेश्राम यांनी संत सेवालाल  महाराज हे त्यागी, दूरदर्शिता, बुद्धिप्रामाण्य विचारांचे महान संत व थाेर समाजसुधारक हाेते. संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी बाेल मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पाडले असे सांगितले. या समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. डी राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकात  संत

MB NEWS-परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाने केली कारवाई ४ लाखांचा गुटखा जप्त

इमेज
  परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाने केली कारवाई ४ लाखांचा गुटखा जप्त  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने परळी शहरातील अमर ग्राउंडवरील एका किराणा दुकानावर काल सायंकाळी छापा मारला. यात ४ लाख ४० हजार ४६५ रुपयांचा गुटखा जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. तर तिघे  फरार झाले आहेत.        राज्यात गुटखाबंदी असताना बेकायदेशीररित्या किराणा दुकानातून गुटखा विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा मारला. दुकानातून विविध प्रकारचा ४ लाख ४० हजारांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळे करत असल्याची माहिती पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.       

MB NEWS- 🔸 *भूतदया आणि मानवतेची शिकवण संत सेवालाल महाराज यांनी दिली- श्रीराम चव्हाण* • _कै.राजीव गांधी अनु. जाती जमाती निवासी आश्रमशाळा खडका येथे सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी_

इमेज
 🔸 *भूतदया आणि मानवतेची शिकवण संत सेवालाल महाराज यांनी दिली- श्रीराम चव्हाण*  • _कै.राजीव गांधी अनु. जाती जमाती निवासी आश्रमशाळा खडका येथे सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी_  सोनपेठ,प्रतिनिधी....     कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्था संचलित कै राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना शाळेचे सहशिक्षक श्रीराम चव्हाण यांनी सांगितले की, संत सेवालाल महाराज हे मानवतेची शिकवण देणारे संत होते. भूतदया आणि मानवता या त्यांच्या सद्गुणांचा आपण अंगीकार केला पाहिजे.          कै. राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे संत सेवालाल महाराज जयंती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीगृह अधीक्षक डी. एम. माने हे होते यावेळी शाळेचे शिक्षक एस. एम. राठोड, आर. बी. जोशी, डी. एल. भिसेगावकर, इ.एन.हरगिले, शुभम चाकोरे, मनेष चव्हाण, साहेब भालेराव, बाळासाहेब मोकाशे, आदींसह कर्मचारी उपस्थित होते यावेळी विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींनी

MB NEWS-परळी तालुक्यातील जेष्ठ नेते गोपीनाथ पवार यांचे निधन

इमेज
  परळी तालुक्यातील जेष्ठ नेते गोपीनाथ पवार यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         गडदेवाडी येथील रहिवासी व सध्या सोनपेठ येथे वास्तव्य असलेले माजी सरपंच गडदेवाडी, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे  संचालक व जिल्हा परिषदचे माजी सदस्य  गोपीनाथराव पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ८३ वर्षे वयाचे होते.       गोपीनाथराव पवार हे  बळीराम पवार (निवृत आयुक्त), बापूराव पवार (अतिरिक्त जिल्हाधिकारी मुंबई) व किशनराव पवार ( पणन अधिकारी, मुंबई ) यांचे वडील होत. तसेच डॉ. कोंडीराम पवार व सिताराम पवार (निवृत उप पोलिस अधीक्षक) यांचे बंधू होत. त्यांच्यामागे ३ मूले, ४ मुली, २ भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दि. १५ फेब्रुवारी २०२२ सकाळी ११ वाजता राहत्या घरापासून सोनखेड, सोनपेठ येथुन निघेल. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

MB NEWS-चोरट्यांचा धुमाकूळ: २लाख ‌८६ हजाराची चोरी; नागरिकांमध्ये दहशत

इमेज
  चोरट्यांचा धुमाकूळ: २लाख ‌८६ हजाराची चोरी; नागरिकां मध्ये दहशत     परळी वैजनाथ/प्रतिनिधी......        दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी व अंबाजोगाई तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन चोरीची मोठी घटना बर्दापुर येथे दि.१२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.   या चोरीत २लाख ‌८६ हजार रोख रक्कम पळवली आहे.          सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्याने लोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत. दररोज चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत आहे. दि.१२ रोजी बर्दापुर येथे फिर्यादी बलभीम विश्वनाथ मोरे यांच्या  दुकानी चोरी झाली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून गल्लयातील २लाख ‌८६ हजार रोख रक्कम पळवली आहे. बर्दापुर पोलीसात गुन्हा

MB NEWS-चोरांचा रेल्वे मार्ग विद्युतीकरणाच्या कामावरुन केबलवर डल्ला मारण्याचा प्रयत्न

इमेज
चोरांचा रेल्वे मार्ग विद्युती करणाच्या कामावरुन केबलवर डल्ला मारण्याचा प्रयत्न  परळी/प्रतिनिधी....... परळी वैजनाथ  रेल्वे ट्रॅकवरील विद्युतीकरणाचे काम सध्या चालू असून परळीपयर्ंंत लवकरच काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामाच्या साहित्याकडे चोरांनी मोर्चा वळवला.मोठ्या प्रमाणात केबल तोडून घेऊन जाण्याची तयारी केली होती मात्र चोरट्यांचा मनसुबा उधळून गेला.            परळी वैजनाथ  रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात येत असून नरसिंह पोखर्णी पासून पुढे सध्या काम चालू आहे. विद्युतीकरण झाल्यानंतर रेल्वेची गती वाढणार असून रेल्वेचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. हे विद्युतीकरण काम सुरू असल्याने रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी पोल,अॅंगल,केबल वायर असे साहित्य ठेवलेले आहे.दरम्यान धर्मापुरी फाटा गेटजवळील परिसरात दि.१३ रोजी मध्यरात्री नंतर अज्ञातांकडून केबल तोडण्यात आले. चोरीच्या उद्देशाने हे केबल तोडण्यात आले होते वेळीच ही बाब कामावरील लोकांना समजल्याने हजारो रुपयांची चोरी टळली आहे.याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध विद्युतीकरण काम करणारी कंपनी केईसी कंपनीचे पुष्पेंद्र पांडे यांच्या फिर

MB NEWS- *प्रा. शोभा शेळके यांना मातृशोक* *श्रीमती शांताबाई वानखेडे यांचे दुःखद निधन*

इमेज
 *प्रा. शोभा शेळके यांना मातृशोक* *श्रीमती शांताबाई वानखेडे यांचे दुःखद निधन* परळी (प्रतिनिधी)...    परळी शहरातील सेवानिवृत्त प्राध्यापक शोभाताई शेळके यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई शिवाजीराव वानखेडे यांचे प्राध्यापक शेळके सर यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 86 वर्ष होते.     कै. शांताबाई वानखेडे या अतिशय संस्कृतिक तथा धार्मिक वृत्तीच्या होत्या. सर्वांशी मनमिळाऊपने, आपुलकीने वागणे व सर्वांना सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे त्या सर्व सुपरिचित होत्या. मागील पंधरा वर्षांपासून त्या परळीतील प्रा. शेळके सर यांच्या निवासस्थानी वास्तव्यास होत्या. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून कै. शांताबाई वानखेडे यांच्या पश्चात दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. जागृती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके सर यांच्या त्या सासुबाई होत.

MB NEWS-अजित जाधव व अशुतोष देशमुख या युवा क्रिकेटपटूंचे विनोद कांबळी कडून कौतुक

इमेज
  अजित जाधव व अशुतोष देशमुख या युवा क्रिकेटपटूंचे विनोद कांबळी कडून कौतुक * माजी अंतरराष्टीय खेळाडू विनोद कांबळी च्या हस्ते अबांजोगाई च्या अजित जाधव अशीतोष देशमुख चा सत्कार * अबांजोगाई चा अशीतोष देशमुख ,अजित जाधव याना शालेय जीवना पासुन क्रिकेट खेळाची आवड़ होती अजित हा शालेय जीवनात असतानाच स्कूल नॅशनल खेळला आहे अजित हा प्रसिद्ध व्यापारी अनिल जाधव यांचा मुलगा आहे तर अशीतोष हा शरदराव देशमुख यांचा मुलगा आहे हे दोघ शालेय जीवना पासून अबांजोगाई क्रिकेट अकॅडमी मधे प्रशिक्षक मोहित परमार यांच्या मार्गदर्शना खाली प्रशिक्षण घेत आहेत सध्या मुंबई येतील ओमटेक्स (ICWC)इंस्टिट्यूट या ठिकाणी निवड चाचणी साठी 350 खेळाडू मधून अबांजोगाई चे 4 खेळाडूनची निवड झाली जे खेळाडू प्रैक्टिस करुण मैदाना मध्ये घाम गाळतात त्याच खेळाडू ना  विजय मिळत असतो हे खेळाडू मुंबई या ठिकाणी  प्रोजेक्टर प्रमुख सुरु नायक,ऑपरेशन प्रमुख राजेश सुतार सर् व त्यांची ओमटेक्स(ICWC) ची टीम यांच्या कड़े क्रिकेट प्रशिक्षण घेत आहेत तसेच ओमटेक्स(ICWC) इंस्टिट्यूट चे प्रमुख विजयजी पटेल यांचे पण मार्गदर्शन मोलाचे आहे मुंबई या ठिकाणी MCA च्या स्पर्धे

MB NEWS-दुर्दैवी: अगोदर प्रेम,नंतर ब्रेकअप मग जिवंत जाळले अखेर व्हॅलेंटाईन डे दिवशी संपली जीवनयात्रा

इमेज
  दुर्दैवी: अगोदर प्रेम,नंतर ब्रेकअप मग जिवंत जाळले अखेर व्हॅलेंटाईन डे दिवशी संपली जीवनयात्रा नाशिक :  अगोदर प्रेम,नंतर ब्रेकअप मग जिवंत जाळले अखेर व्हॅलेंटाईन डे दिवशी संपली जीवनयात्रा अशी दुर्दैवी कहाणी घडली आहे. देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे प्रेयसीने व तीच्या कुटुंबीयांनी जिवंत जाळलेल्या प्रियकराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरुणी व तीचे आई-वडील आणि दोन भाऊ (रावळगाव ता. मालेगाव) यांनी मुलाच्या गावात जाऊन त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. शुक्रवारी हा प्रकार घडला होता. या घटनेत प्रियकर तरुण 80 टक्के भाजल्याची माहिती समोर आली होती. सात वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर झालेला ब्रेक अप आणि आपले इतरत्र ठरलेले लग्न मोडल्याच्या संशयातून प्रेयसीने प्रियकर गोरख बच्छाव याच्या अंगावर पेट्रोल टाकून प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांनी त्याला जिवंत जाळले होते. त्याच्यावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. देवळा पोलिसांनी या प्रकरणी प्रेयसी कल्याणी सोनवणेसह तिची आई, वडील आणि दोन भाऊ अश

MB NEWS-सह्याद्री देवराई जळीत प्रकरणी सखोल चौकशी करावी- वृक्षसंवर्धन चळवळीची मागणी

इमेज
  सह्याद्री देवराई जळीत प्रकरणी सखोल चौकशी करावी- वृक्षसंवर्धन चळवळीची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         जगातील पहिले वृक्ष संमेलन झालेल्या बीड सह्याद्री देवराईला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत हजारो झाडे जळाली आहेत. सिनेअभीनेते सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांची ही संकल्पना असून मोठ्या परिश्रमातून ही देवराई उभी राहिलेली होती. तसेच आता ती पर्यटन स्थळ बनली होती. आगीत झाडे जळाल्याची माहिती मिळाल्‍यानंतर  वृक्षमित्रांनी हळहळ व्यक्‍त केली. ही आग लागली की, कोणी लावली? असा सवाल करत सखोल चौकशी करावी  अशी मागणी परळीतील वृक्षसंवर्धन चळवळीच्या वतीने करण्यात आली आहे.                याबाबत परळीत वृक्षसंवर्धन चळवळीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.   बीडपासून जवळच असलेल्या पालवन येथे अभिनेते सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांच्या संकल्पनेतून सह्याद्री देवराई उभारण्यात आली आहे. निसर्गाचे देणे लाभलेली ही सह्याद्री देवराई बीडकरांसाठी पर्यटनस्थळ बनली आहे. शनिवारी दुपारी सह्याद्री देवराईला अचानक आग लागली. या आगीत दोन ते अडीच एकर क्षेत्रावरील लिंब, वड, पिंपळ अशी पाचशेहू

MB NEWS-अचानक चालत्या कारला लागली आग.....झाला धुराळा !( Video News)

इमेज
  अचानक चालत्या कारला लागली आग.....झाला धुराळा ! केज-अंबाजोगाई रोडवर गाडीने पेट घेतला : गाडी जळून खाक  केज-अंबाजोगाई रोडवर कुंबेफळ जवळ एका चालत्या गाडीने पेट घेतला आहे. मात्र त्यात जिवीत हानी झाली नाही. या बाबतची माहिती अशी की, दि. १४ फेब्रुवारी मंगळवार रोजी सकाळी ८:३० वा. लातूर कडून निघालेले (एमएच-४८/एस-२८५२) ही निसान गाडी लातूर कडून औरंगाबाच्या दिशेने जात असताना कुंबेफळ जवळ येताच तिने अचानक पेट घेतला. चालकाच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवून आतील सर्वांना खाली उतरले. त्यामुळे सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे जिवीत हानी टळली. सदर घटनेची माहिती केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांना दिली आहे.            🔸🔸🔸 video 🔸🔸🔸🔸

NEWS- *आग लागली की, कोणी लावली? सखोल चौकशी करावी- वृक्षमित्र अनंत इंगळे*

इमेज
 *आग लागली की, कोणी लावली? सखोल चौकशी करावी- वृक्षमित्र अनंत इंगळे* C परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         जगातील पहिले वृक्ष संमेलन झालेल्या बीड सह्याद्री देवराईला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत हजारो झाडे जळाली आहेत. सिनेअभीनेते सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांची ही संकल्पना असून मोठ्या परिश्रमातून ही देवराई उभी राहिलेली होती. तसेच आता ती पर्यटन स्थळ बनली होती. आगीत झाडे जळाल्याची माहिती मिळाल्‍यानंतर  वृक्षमित्रांनी हळहळ व्यक्‍त केली. ही आग लागली की, कोणी लावली? असा सवाल करत सखोल चौकशी करावी  अशी मागणी वृक्षमित्र अनंत इंगळे यांनी केली आहे.         बीडपासून जवळच असलेल्या पालवन येथे अभिनेते सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांच्या संकल्पनेतून सह्याद्री देवराई उभारण्यात आली आहे. निसर्गाचे देणे लाभलेली ही सह्याद्री देवराई बीडकरांसाठी पर्यटनस्थळ बनली आहे. शनिवारी दुपारी सह्याद्री देवराईला अचानक आग लागली. या आगीत दोन ते अडीच एकर क्षेत्रावरील लिंब, वड, पिंपळ अशी पाचशेहून अधिक झाडे जळाली.सह्याद्री देवराईत १४ फेब्रुवारी २०२० मध्ये जगातील पहिले वृक्ष संमेलन घेण्यात आले होते. येथील देखण्या नि

MB NEWS-वारकरी सांप्रदाय एवढा विशाल आणि तत्वज्ञानाची बैठक असलेला असून या मराठी मातीत इतरांचा शिरकाव होतोच कसा ?- ॲड दत्तात्रय महाराज आंधळे

इमेज
  वारकरी सांप्रदाय एवढा विशाल आणि तत्वज्ञानाची बैठक असलेला असून या मराठी मातीत इतरांचा शिरकाव होतोच कसा ?-  ॲड दत्तात्रय महाराज आंधळे नाशिक(प्रतिनिधी) वारकरी संप्रदायाचे प्रचार करणाऱ्या , लोकांनी आत्मचिंतन करण्याची गरज असून वारकरी सांप्रदाय एवढा विशाल आणि तत्वज्ञानाची बैठक असलेला असून या मराठी मातीत इतरांचा शिरकाव होतोच कसा ?असा प्रश्न संतवाड्मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केला.            नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले असून या सप्ताहातील काल कीर्तन पुष्प गुंफताना , "हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥ गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥ या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर  सुश्राव्य व चिकित्सक पद्धतीने कीर्तन  श्री आंधळे महाराज यांनी दिनांक १२फेब्रुवारी २०२२रोजी केले.           या कीर्तनास महंत जनेश्वरानंद बाबा मठाधिपती भारतमाता आश्रम, गायनाचार्य ह.भ.प.श्री गोकुळ महाराज पुंडे,  ह.भ.प.श्रीविनोद महाराज लियारे,मृदंगाचार्य ह.भ.प.श्रीअरुण महाराज मुंबई,श्री बन्शी महाराज घारे ,ह.भ.प.श्

MB NEWS-हळदी कुंकवाचे वाण; आत्मियतेचे स्वागत आणि आनंदाचा वसा; परळीत दैदिप्यमान व शानदार समारंभ(Video & News)

इमेज
हळदी कुंकवाचे वाण; आत्मियतेचे स्वागत आणि आनंदाचा वसा; परळीत दैदिप्यमान व शानदार समारंभ सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे व मुंडे कुटुंबियांचे मकरसंक्रांत हळदी कुंकू  परळी (प्रतिनिधी) --- : परळी येथे मतदारसंघातील महिलांसाठी सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे, सौ. मनीषाताई अजय मुंडे, सौ. सरिताताई विजय मुंडे, सौ. अमृताताई रामेश्वर मुंडे, सौ. सोनालीताई अभय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदी कुंकू समारंभाचे धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते.  यावेळी परळी शहरासह परळी व अंबाजोगाई तालुक्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात या समारंभात हजेरी लावून हळदी कुंकू देत वाण लुटले. सलग दोन दिवस हा समारंभ उत्साहात सुरू होता. परळीतील महिलांसाठी हळदी कुंकवासह विविध कार्यक्रम सौ. राजश्रीताई दरवर्षी आयोजित करत असतात, मात्र मागील दोन वर्षात कोविडच्या संसर्गामुळे हा कार्यक्रम घेता आला नव्हता. यावर्षी मात्र महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमास पाहायला मिळाला. या समारंभात मुंडे कुटुंबियांसह राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. संगीताताई तुपसागर, तालुकाध्यक्ष सौ. कल्प

MB NEWS-*ना.धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली उद्या नंदागौळात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचे आयोजन!*

इमेज
  *ना.धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली उद्या नंदागौळात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचे आयोजन!*   *कानाची कॉम्प्युटराईजड मशिनने 500 रु.  ची तपासणी मोफत!* *डॉ.संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते यांच्या संयुक्त माध्यमातून उपक्रम!* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील नागरिकांची कानाची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी व श्रवणयंत्राचे मोफत वाटप उद्या  रविवारी १३  फेब्रुवारी रोजी  करण्यात येणार असून यावेळी बीड येथील डॉ.जयशंकर तामसेकर व डॉ.मोहन मुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती नंदागौळ ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आली आहे.     सामाजिक कार्यकर्ते व एनसीपी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते या दोघांच्या माध्यमातून नंदागौळ येथे 2012 पासून अनेक आरोग्य तपासणी विषयक शिबिरे,मोफत तपासणी तसेच अनेक श्रवणयंत्रांचे यापूर्वी वाटप केलेले आहे,परंतु सध्या अनेक नागरि

MB NEWS-प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

इमेज
  प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन पुणे : बजाज उद्योग समूहाचे चेअरमन व राज्यसभेचे सदस्य राहुल बजाज  यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. त्यांनी तब्बल 5 दशके बजाज उद्योगसमूहाचे नेतृत्व केले. त्यांनी आज पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे.  त्यांच्यावर मागील 8 ते 10 दिवसांपासून उपचार सुरु होते.  राहुल बजाज हे भारतीय अब्जाधीश आणि प्रसिद्ध उद्योगपती होते. ते बजाज समूहाचे चेअरमन होते. त्यांचा जन्म 10 जून 1938 रोजी झाला होता. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून MBA चे शिक्षण पूर्ण केले. 1965 पासून त्यांनी बजाज समूहात काम करण्यास सुरुवात केली होती. बजाज ऑटोला नावारूपास आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये त्यांना तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता.

MB NEWS-अपहरणाच्या गुन्ह्यात कलम वाढवले;अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

इमेज
  अपहरणाच्या गुन्ह्यात कलम वाढवले;अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        एक वर्षापूर्वी(सन 2021) एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा संभाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यात आता वाढीव कलम लावण्यात आले असुन लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार आरोपीविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.            याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील नमुद आरोपी कृष्णा प्रकाश सावळे वय 23 वर्षे याने पिडीत  17 वर्षिय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावुन पळवुन नेले होते. तथागतनगर नांदेड येथे घेवून जावुन तिच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापीत केले म्हणून नमुद गुन्हयात वाढीव कलम 376(2)(N),366 भा.दं.वि.,संस्करण 4 बाललैंगीक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पिंक मोबाईल पथक प्रमुख  पोउपनि वैशाली पेटकर या करीत आहेत.

MB NEWS-शाळकरी मुलीशी गैरवर्तन भोवले; १८वर्षिय युवकावर पोस्को गुन्हा दाखल

इमेज
  शाळकरी मुलीशी गैरवर्तन भोवले; १८वर्षिय युवकावर पोस्को गुन्हा दाखल   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      एका अल्पवयीन शाळकरी मुलीशी छेडछाड करणाऱ्या व गैरवर्तन करणाऱ्या १८ वर्षिय युवकावर पोस्को कायद्याअंतर्गत परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,या प्रकरणातील फिर्यादी १६ वर्षिय शाळकरी मुलगी शाळेत जात असताना आरोपी बिबिशन विष्णु भोसले वय 18 वर्षे  रा. वडसाविञीनगर परळी वै. याने गैरवर्तन केले. दि. 11/02/ 2022 रोजी 08.30 वाजण्याचे सुमारास तहसील चे बाजुला स्कुटीवरुन शाळेला जात असतान फिर्यादी मुलीचा पाठलाग करुन विनयभंग केला. यातील आरोपीने यातील फिर्यादी ही तीचे स्कुटीवर शाळेत जात असताना तीचा सतत पाठलाग करुन गाडी थांबवुन तु मला खुप आवडतेस तु मला का बोलत नाहीस मला तुझ्याशी लग्न करावयाचे आहे असे म्हणुन तीचे मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गु.रं.न 25/2022 कलम 354,354 (डी).पोस्को 12 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.प्रभारी अधिकारी पोनी कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाल

MB NEWS-राशिभविष्य (दि. १२ फेब्रुवारी २०२२)

इमेज
  राशिभविष्य (दि. १२ फेब्रुवारी २०२२) मेष: लाभदायक दिवस जाईल, आत्मविश्‍वास वाढेल, कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील, आत्मविश्‍वास वाढेल. वृषभ : बोलताना जपून बोलावे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, मनाविरुद्ध घटना घडतील, व्यावहारिक अडचणी येतील, सावधानता आवश्यक आहे. मिथुन : मनासारख्या गोष्टी घडतील प्रसन्‍नता लाभेल, मनपसंद खरेदीचा आनंद घ्याल, आत्मबल वाढेल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल. कर्क : संयमाने घ्यावे लागेल, अनावश्यक खर्च होईल. प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे. गैरसमजातून वादविवाद होतील. सिंह : उत्साही राहाल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कन्या : आरोग्याच्या द‍ृष्टीने उत्तम दिवस, प्रेरणादायी कार्य कराल, वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, कार्यसिद्धी होईल. तूळ : जुने आजार तोंड वर काढतील, परावलंबी स्वभावामुळे कामे रखडतील, नियोजन आवश्यक आहे. गुंतवणुकीस अयोग्य दिवस. वृश्‍चिक : वादविवादापासून दूर रहा, संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे, अस्वस्थता राहील, कृतकर्माचा पश्‍चात्ताप होईल, आर्थिकद‍ृ

MB NEWS-परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायण भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

इमेज
  परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायण भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परळी वैजनाथ, प्रतिनिधी......     समर्थ रामदास नवमी च्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंच्या पावन भूमीत परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये समर्थ भक्तांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.            रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत समर्थ रामदास स्वामी यांची दि.२५ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. माघ वद्य नवमीला रामदास स्वामी समाधीस्त झाले. म्हणून या तिथीला रामदास नवमी असे संबोधले जाते. बलोपासनाचे समर्थक, मनाचे श्लोक, दासबोध यातून प्रापंचिक ज्ञान आणि परमार्थिक मार्गाची दिशा देणाऱ्या रामदास स्वामींच्या या दासबोध या ग्रंथाचे सामुदायिक पारायण केले जाणार आहे.ब्राह्मण सभेचे श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, देशपांडे गल्ली, परळी वैजनाथ येथे १७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०:३० ते १  सामुदायिक पारायण होणार आहे.तरी या पारायणात मोठ्य

MB NEWS-सिरसाळा: 'त्याने' भर बाजारात खिशातून मोबाईल काढून चोरला;पुढे घडलं असं की.......

इमेज
  सिरसाळा: 'त्याने' भर बाजारात खिशातून मोबाईल काढून चोरला;पुढे घडलं असं की....... परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      भरबाजारात बाजार करीत असताना पापणी लवायच्या आत एका चोरट्याने खिशातील मोबाईल काढून चोरला.आपला मोबाईल काढून घेतला गेल्याचे लक्षात आल्यावर आरडाओरडा केला.तेव्हा बाजारात असलेल्या दोन पोलीसांच्या तत्परतेमुळे मोबाईल व चोर पकडण्यात यश आले.सिरसाळा बाजारात ही घटना घडली.      याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी आर.जी.वैराळे मल्टीस्टेट चे शाखा व्यवस्थापक देविदास मुकुंदराज मुंडे हे  सिरसाळा बाजारात दि.१० रोजी सायंकाळी बाजार करीत होते.मोबाईल वरच्या खिशात ठेवला होता.बाजार करत असताना एक इसम जवळ आला.हातचालाखीने त्याने त्यांच्या खिशातील मोबाईल अलगत काढुन घेतला.परंतु काही क्षणात आपला मोबाईल खिशात नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चोर....चोर असा आरडाओरडा केला.तेव्हा बाजारात उपस्थित असणारे पोलीस अंमलदार  संजय व अस्लम यांनी चोराला पकडण्यात यश मिळवले.याप्रकरणी फिर्यादी आर.जी. वैराळे मल्टीस्टेट चे शाखा व्यवस्थापक देविदास मुकुंदराज मुंडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आर

MB NEWS-या कारणांमुळे होणार बीड जिल्ह्यातील शाळा सुरू....

इमेज
  या कारणांमुळे होणार बीड जिल्ह्यातील शाळा सुरू.... बीड दि. 11 फेब्रुवारी - राज्य शासनाने दि. 24 जानेवारी पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून या अनुषंगाने बीड  जिल्हा प्रशासनाने केवळ आठवी ते बारावी वर्ग सुरु केली होती. मात्र आता जिल्ह्यात पुढील सोमवारपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरु ठेवण्याची सुचना शिक्षण विभागाला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा  यांनी दिले आहेत.        राज्य शासनाने राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या  पार्श्वभूमीवर 15 फेब्रुवारीपर्यंत दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, शाळा व महाविद्यालय बंदच्या निर्णयासह निर्बंध कडक केले होते. मात्र कोरोना आलेख खालावल्यामुळे राज्य शासनाने कोरोना आटोक्यात असलेल्या जिल्ह्यात दि.24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.

MB NEWS-जिथे 'लखन' तिथे 'नाविन्य' व 'कल्पकता'.........!(Video/News)

इमेज
  जिथे 'लखन' तिथे 'नाविन्य' व 'कल्पकता'.........! परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       लखन परळीकर हे परळी सह संबंध महाराष्ट्रात परिचित झालेलं नाव. नवनवीन प्रयोग,आयाम देत कलेच्या क्षेत्रातील आजचे 'युथ आयकॉन' बनले आहेत.जिथे 'लखन' तिथे 'नाविन्य' व 'कल्पकता' येतेच याचा प्रत्यय त्यांनी नेहमीच दाखवून दिला आहे. नुकतेच हे कल्पक संयोजन हळदी कुंकू समारंभ आयोजनात बघायला मिळाले. परळीत अतिशय'देखणा' कार्यक्रम त्यांनी घेतला.तमाम महिला वर्गात हा समारंभ लोकप्रिय ठरला.          मकर संक्रांत निमित्त "लखन परळीकर" या  निवासस्थानी "फ्यूजन फॅशन सलून व लखन्स मेकप हब & हेअर स्टुडिओ" ग्रुपच्या वतीने हळदी-कुंकू आणि तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला होता,मोठ्या संख्येने शहरातील विविध भागातील, विविध क्षेत्रातील कार्यरत महिला मंडळींनी उपस्थीती दर्शविली.            लखनस मेकअप हब व फ्युजन फँशन पार्लर यांच्या वतिने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व शानदार संपन्न झाला. कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट व शानदार मांडणी मनमोहक करण्यात आल