MB NEWS-परळी तालुक्यातील जेष्ठ नेते गोपीनाथ पवार यांचे निधन

  परळी तालुक्यातील जेष्ठ नेते गोपीनाथ पवार यांचे निधन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        गडदेवाडी येथील रहिवासी व सध्या सोनपेठ येथे वास्तव्य असलेले माजी सरपंच गडदेवाडी, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे  संचालक व जिल्हा परिषदचे माजी सदस्य  गोपीनाथराव पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ८३ वर्षे वयाचे होते.

      गोपीनाथराव पवार हे  बळीराम पवार (निवृत आयुक्त), बापूराव पवार (अतिरिक्त जिल्हाधिकारी मुंबई) व किशनराव पवार ( पणन अधिकारी, मुंबई ) यांचे वडील होत. तसेच डॉ. कोंडीराम पवार व सिताराम पवार (निवृत उप पोलिस अधीक्षक) यांचे बंधू होत. त्यांच्यामागे ३ मूले, ४ मुली, २ भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दि. १५ फेब्रुवारी २०२२ सकाळी ११ वाजता राहत्या घरापासून सोनखेड, सोनपेठ येथुन निघेल.

त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !