🔸 *भूतदया आणि मानवतेची शिकवण संत सेवालाल महाराज यांनी दिली- श्रीराम चव्हाण*
• _कै.राजीव गांधी अनु. जाती जमाती निवासी आश्रमशाळा खडका येथे सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी_
सोनपेठ,प्रतिनिधी....
कै. राजकुमार मव्हाळे ग्रामीण विकास सेवाभावी संस्था संचलित कै राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना शाळेचे सहशिक्षक श्रीराम चव्हाण यांनी सांगितले की, संत सेवालाल महाराज हे मानवतेची शिकवण देणारे संत होते. भूतदया आणि मानवता या त्यांच्या सद्गुणांचा आपण अंगीकार केला पाहिजे.
कै. राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे संत सेवालाल महाराज जयंती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीगृह अधीक्षक डी. एम. माने हे होते यावेळी शाळेचे शिक्षक एस. एम. राठोड, आर. बी. जोशी, डी. एल. भिसेगावकर, इ.एन.हरगिले, शुभम चाकोरे, मनेष चव्हाण, साहेब भालेराव, बाळासाहेब मोकाशे, आदींसह कर्मचारी उपस्थित होते यावेळी विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींनी संत सेवालाल महाराज प्रतिमेला पूजन करून अभिवादन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा