इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-*ना.धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली उद्या नंदागौळात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचे आयोजन!*

  *ना.धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली उद्या नंदागौळात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचे आयोजन!*

 


*कानाची कॉम्प्युटराईजड मशिनने 500 रु.  ची तपासणी मोफत!*


*डॉ.संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते यांच्या संयुक्त माध्यमातून उपक्रम!*



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील नागरिकांची कानाची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी व श्रवणयंत्राचे मोफत वाटप उद्या  रविवारी १३  फेब्रुवारी रोजी  करण्यात येणार असून यावेळी बीड येथील डॉ.जयशंकर तामसेकर व डॉ.मोहन मुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती नंदागौळ ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आली आहे.



    सामाजिक कार्यकर्ते व एनसीपी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते या दोघांच्या माध्यमातून नंदागौळ येथे 2012 पासून अनेक आरोग्य तपासणी विषयक शिबिरे,मोफत तपासणी तसेच अनेक श्रवणयंत्रांचे यापूर्वी वाटप केलेले आहे,परंतु सध्या अनेक नागरिकांची मागणी येत असल्याने गावातील नागरिकाना गावातच तपासणी व जाग्यावर श्रवणयंत्रांचे वापट करण्यात येणार आहे,कर्णबधिर असलेल्या नागरिकांच्या कानाची प्रत्येकी 500 रुपयांची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी करण्यात येणार आहे,यासाठी रविवार दि 13 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत गावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत,नंदागौळ च्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या