MB NEWS-परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाने केली कारवाई ४ लाखांचा गुटखा जप्त

  परळीत पंकज कुमावत यांच्या पथकाने केली कारवाई ४ लाखांचा गुटखा जप्त 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने परळी शहरातील अमर ग्राउंडवरील एका किराणा दुकानावर काल सायंकाळी छापा मारला. यात ४ लाख ४० हजार ४६५ रुपयांचा गुटखा जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. तर तिघे  फरार झाले आहेत.

       राज्यात गुटखाबंदी असताना बेकायदेशीररित्या किराणा दुकानातून गुटखा विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा मारला. दुकानातून विविध प्रकारचा ४ लाख ४० हजारांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळे करत असल्याची माहिती पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.

      


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !