प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी बसस्थानकाचे रुपडे बदलणार!

  धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी बसस्थानकाचे रुपडे बदलणार! 



*बसस्थानक बांधकाम व विकासाचा आराखडा अंतिम करण्यासाठी वास्तू विशारद, वरिष्ठ अधिकारी व स्वतः ना. मुंडे स्थळ पाहणी करून आराखड्यातील बदल सुचवणार*


मुंबई (दि. 15) ---- : परळी शहर बस स्थानक बांधकाम व परिसराचा विकास करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून परिवहन विभागाने तयार केलेला आराखडा अंतिम करण्यापूर्वी त्यात बस स्थानकाचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी काही बदल करण्याचे सुचवले आहे. 


हे बदल प्रत्यक्ष आराखड्यात समाविष्ट करण्यासाठी परिवहन विभागाचे वास्तू विशारद, वरिष्ठ अधिकारी आदींना धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यासाठी पाचारण केले आहे. धनंजय मुंडे हे स्वतः त्यांच्यासोबत बस स्थानकात जाऊन त्यांना अपेक्षित असलेले बदल आराखड्यात सुचवणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत ठरले आहे. 


परळी शहर बसस्थानाकाचा सुधारित आराखडा आज मुंबई येथे ना. धनंजय मुंडे यांच्या समोर सादर करण्यात आला. यावेळी परिवहन विभागातील बांधकाम महाव्यवस्थापक भूषण देसाई, वाहतूक महाव्यवस्थापक, स्थापत्य कार्यकारी अभियंता, संबंधित वास्तू विशारद तसेच परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


परळी शहरातील बसस्थानक नूतनीकरण व विकासासाठी आवश्यक निधी मंजूर आहे, मात्र बसस्थानाकाचा एका बाजूस व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारून त्याद्वारे बसस्थानाकाच्या उत्पन्नात वृद्धी करणे देखील सहज शक्य असल्याचे धनंजय मुंडे यांनी यापूर्वी परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देखील नमूद केले होते. 


त्या दृष्टीने परिवहन विभागाचे वास्तू विशारद व अन्य वरिष्ठ अधिकारी व स्वतः धनंजय मुंडे हे आता बस स्थानकात प्रत्यक्ष भेट देऊन विकास आराखड्यात अंतिम बदल करणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या