इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-अपहरणाच्या गुन्ह्यात कलम वाढवले;अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

  अपहरणाच्या गुन्ह्यात कलम वाढवले;अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       एक वर्षापूर्वी(सन 2021) एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा संभाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यात आता वाढीव कलम लावण्यात आले असुन लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमानुसार आरोपीविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील नमुद आरोपी कृष्णा प्रकाश सावळे वय 23 वर्षे याने पिडीत  17 वर्षिय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावुन पळवुन नेले होते. तथागतनगर नांदेड येथे घेवून जावुन तिच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापीत केले म्हणून नमुद गुन्हयात वाढीव कलम 376(2)(N),366 भा.दं.वि.,संस्करण 4 बाललैंगीक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पिंक मोबाईल पथक प्रमुख  पोउपनि वैशाली पेटकर या करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या