MB NEWS-परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायण भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

  परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायण

भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

    समर्थ रामदास नवमी च्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंच्या पावन भूमीत परळीत सामुदायिक ग्रंथराज दासबोध पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये समर्थ भक्तांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.



      

  









 रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत समर्थ रामदास स्वामी यांची दि.२५ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. माघ वद्य नवमीला रामदास स्वामी समाधीस्त झाले. म्हणून या तिथीला रामदास नवमी असे संबोधले जाते. बलोपासनाचे समर्थक, मनाचे श्लोक, दासबोध यातून प्रापंचिक ज्ञान आणि परमार्थिक मार्गाची दिशा देणाऱ्या रामदास स्वामींच्या या दासबोध या ग्रंथाचे सामुदायिक पारायण केले जाणार आहे.ब्राह्मण सभेचे श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, देशपांडे गल्ली, परळी वैजनाथ येथे १७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०:३० ते १  सामुदायिक पारायण होणार आहे.तरी या पारायणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.नियोजन व अधिक माहितीसाठी  93704 24811 या क्रमांकावर संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !