MB NEWS-चोरट्यांचा धुमाकूळ: २लाख ‌८६ हजाराची चोरी; नागरिकांमध्ये दहशत

  चोरट्यांचा धुमाकूळ: २लाख ‌८६ हजाराची चोरी; नागरिकां मध्ये दहशत 

 







 परळी वैजनाथ/प्रतिनिधी......

       दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी व अंबाजोगाई तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन चोरीची मोठी घटना बर्दापुर येथे दि.१२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.   या चोरीत २लाख ‌८६ हजार रोख रक्कम पळवली आहे. 

        सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्याने लोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत. दररोज चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत आहे. दि.१२ रोजी बर्दापुर येथे फिर्यादी बलभीम विश्वनाथ मोरे यांच्या  दुकानी चोरी झाली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून गल्लयातील २लाख ‌८६ हजार रोख रक्कम पळवली आहे. बर्दापुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोउपनि चोपणे हे करीत आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार