इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार



 धारूर, प्रतिनिधी....

       धारुर शहरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी धारुर पोलिसात  दोन आरोपी विरुध्द आज 16 फेब्रुवारी सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

         पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत नोंदवलेल्या  माहितीनूसार एका फोटो स्टुडिओत पासपोर्ट फोटो काढण्यासाठी गेली असता यातील आरोपीने पासपोर्ट फोटो काढून त्या दिवशी न देता फिर्यादीला दुसर्‍यादिवशी  बोलावून घेऊन तिचे इच्छे विरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध केले व ही गोष्ट कोणास सांगितल्यास मी तुझ्या भावाला खल्लास करेल अशी धमकी दिली.तसेच आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादी व दोन्ही आरोपी हे एका दिवशी तिघेजण फोटो स्टुडिओ मध्ये गप्पा मारत बसले असता आरोपी क्रमांक एक हा फोटो काढण्याच्या कामासाठी बाहेर गेला. यावेळी  यातील आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादी सोबत शारीरिक संबंध ठेवले व ही गोष्ट कोणालाही न सांगण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला गु.र.न.22/2022 नुसार धारूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित   मुलीच्या तक्रारीवरून आरोपी मधूर बालासाहेब फरतडे व सहदेव चाळक दोन्ही रा. धारुर यांच्यावर  कलम 376, 504 भादवि व कलम 4,5 पोस्को ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक  व्हि. एस आटोळे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!