MB NEWS-सिरसाळा: 'त्याने' भर बाजारात खिशातून मोबाईल काढून चोरला;पुढे घडलं असं की.......

  सिरसाळा: 'त्याने' भर बाजारात खिशातून मोबाईल काढून चोरला;पुढे घडलं असं की.......



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     भरबाजारात बाजार करीत असताना पापणी लवायच्या आत एका चोरट्याने खिशातील मोबाईल काढून चोरला.आपला मोबाईल काढून घेतला गेल्याचे लक्षात आल्यावर आरडाओरडा केला.तेव्हा बाजारात असलेल्या दोन पोलीसांच्या तत्परतेमुळे मोबाईल व चोर पकडण्यात यश आले.सिरसाळा बाजारात ही घटना घडली.

     याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी आर.जी.वैराळे मल्टीस्टेट चे शाखा व्यवस्थापक देविदास मुकुंदराज मुंडे हे  सिरसाळा बाजारात दि.१० रोजी सायंकाळी बाजार करीत होते.मोबाईल वरच्या खिशात ठेवला होता.बाजार करत असताना एक इसम जवळ आला.हातचालाखीने त्याने त्यांच्या खिशातील मोबाईल अलगत काढुन घेतला.परंतु काही क्षणात आपला मोबाईल खिशात नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चोर....चोर असा आरडाओरडा केला.तेव्हा बाजारात उपस्थित असणारे पोलीस अंमलदार  संजय व अस्लम यांनी चोराला पकडण्यात यश मिळवले.याप्रकरणी फिर्यादी आर.जी. वैराळे मल्टीस्टेट चे शाखा व्यवस्थापक देविदास मुकुंदराज मुंडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास सिरसाळा पोलीस ठाण्याचे पोह भास्कर हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार