MB NEWS-जिथे 'लखन' तिथे 'नाविन्य' व 'कल्पकता'.........!(Video/News)

  जिथे 'लखन' तिथे 'नाविन्य' व 'कल्पकता'.........!



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      लखन परळीकर हे परळी सह संबंध महाराष्ट्रात परिचित झालेलं नाव. नवनवीन प्रयोग,आयाम देत कलेच्या क्षेत्रातील आजचे 'युथ आयकॉन' बनले आहेत.जिथे 'लखन' तिथे 'नाविन्य' व 'कल्पकता' येतेच याचा प्रत्यय त्यांनी नेहमीच दाखवून दिला आहे. नुकतेच हे कल्पक संयोजन हळदी कुंकू समारंभ आयोजनात बघायला मिळाले. परळीत अतिशय'देखणा' कार्यक्रम त्यांनी घेतला.तमाम महिला वर्गात हा समारंभ लोकप्रिय ठरला.



         मकर संक्रांत निमित्त "लखन परळीकर" या  निवासस्थानी "फ्यूजन फॅशन सलून व लखन्स मेकप हब & हेअर स्टुडिओ" ग्रुपच्या वतीने हळदी-कुंकू आणि तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला होता,मोठ्या संख्येने शहरातील विविध भागातील, विविध क्षेत्रातील कार्यरत महिला मंडळींनी उपस्थीती दर्शविली.


           लखनस मेकअप हब व फ्युजन फँशन पार्लर यांच्या वतिने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व शानदार संपन्न झाला. कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट व शानदार मांडणी मनमोहक करण्यात आली होती.या कार्यक्रमा दरम्यान सेल्फी पँईटवर महिलांनी गर्दी केली.लक्षवेधी,अनोख्या रंगोळीने सर्वांचे  लक्ष वेधले. 

🏵️ Video......



महाराष्ट्रातील नामवंत मेकअपमन लखन परळीकर यांच्या समवेत महिलांनी छायाचित्र घेतले. कार्यक्रम स्थळाची विद्युतरोशनाई  व सजावट होती. फ्युजनच्या सर्व टिम साऊथ इंडीयन चा पोषाख केला.वातावरण मनमोहक झाले होते. मेकअप आर्टीस्ट लखन परळीकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

           


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार