इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-संत सेवालाल महाराज हे विज्ञानवादी व दार्शनिक दृष्टीचे संत होते- डॉ व्ही. जे. चव्हाण

  संत सेवालाल महाराज हे विज्ञानवादी व दार्शनिक दृष्टीचे संत होते- डॉ व्ही. जे. चव्हाण      


  परळी, प्रतिनिधी - जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये संत सेवालाल महाराजांची 283 जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी डॉ.व्ही जे चव्हाण यांनी संत सेवालाल महाराज हे विज्ञानवादी  व दार्शनिक दृष्टीचे संत होते असे उद्गार याप्रसंगी व्यक्त केले.

संत सेवालाल महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा  नष्ट करण्याचा प्रयत्न केला.  बंजारा समाज निरक्षर असल्याने महाराजांनी लाेकगीत, भजन लडीच्या माध्यमातून प्रबाेधन केले. त्या काळी समाजाला भजनाची आवड हाेती. हे ओळखून त्यांनी बंजारा बाेलीभाषेत लडी, भजन रचना करून समाजात धार्मिक व सांस्कृतिक बदल घडवून आणले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी व्ही मेश्राम यांनी संत सेवालाल  महाराज हे त्यागी, दूरदर्शिता, बुद्धिप्रामाण्य विचारांचे महान संत व थाेर समाजसुधारक हाेते. संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी बाेल मानवाला वास्तववादी विचार करण्यास भाग पाडले असे सांगितले. या समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. डी राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकात

 संत सेवालाल महाराज यांनी आयुष्यभर तुळजाभवानी मातेची पूजा केली. याचबराेबर हिंदू धर्माची शिकवण दिली. अशा या महान विचारवादी संताची भारतातील कराेडाे लाेक पूजा करतात असे मत प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ आर. डी राठोड तर आभार डॉ बी के शेप यांनी मानले.  या कार्यक्रमाला डॉ अर्चना चव्हाण,  डॉ. रामेश्वर चाटे प्रा. अरुण ढाकणे, प्रा. मनोहर चाटे यांच्या इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!