पोस्ट्स

MB NEWS-विधान परिषद निवडणूक: भाजपाच विजेता !

इमेज
  विधान परिषद निवडणूक: भाजपाच विजेता !    राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, सोमवारी झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत झाली. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली.  या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता लागलेली होती.  हे देखील आवश्य वाचा: 🔴 विश्व संगीत दिवस विशेष वृत्तकथा 🔵 सत्तर वर्षापासून शास्त्रीय संगीताचा वारसा निरपेक्ष वृत्तीने जपणारा परळीतील "भक्ताश्रम"_ विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात होते. विधानसभेतील एक जागा रिक्त तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही. विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर झाला.यामध्ये भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.          हे देखील आवश्य वाचा: 🔵 आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष वृत्तकथा🔵 नौली, वामनौली, दक्षिणनौली या आवघड योगक्रिया लिलया करणारा परळीतील 'सहजयोग

MB NEWS- आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष वृत्तकथा:नौली, वामनौली, दक्षिण नौली या आवघड योगक्रिया लिलया करणारा परळीतील 'सहजयोगी': अॅड. श्रीनिवास मुंडे

इमेज
  नौली, वामनौली, दक्षिण नौली या आवघड योगक्रिया लिलया करणारा परळीतील 'सहजयोगी': अॅड. श्रीनिवास मुंडे प रळी वैजनाथ:....          योगशास्त्र ही भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. योगशास्त्रातील क्रिया या सोप्या नसतात.मात्र योग्य मार्गदर्शन व नित्य सरावाने योगशास्त्रातही व्यक्ती पारंगत होऊ शकतो.याचे उत्तम उदाहरण म्हणजे परळी तालुक्यातील पांगरी (गोपीनाथगड) चे उपसरपंच असलेले अॅड.श्रीनिवास मुंडे हे आहेत.गेल्या अनेक वर्षापासून व्यायाम,योग प्राणायाम यामध्ये नित्य सरावाने पारंगत झालेले अॅड.श्रीनिवास मुंडे योगाच्या आवघडात आवघड क्रियाही अगदी सहजतेने करतात.नौली, वामनौली, दक्षिणनौली या आवघड योगक्रिया लिलया करणारा परळीतील 'सहजयोगी' म्हणून परिचित होत आहेत.        वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट  हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श

MB NEWS-विश्व संगीत दिवस विशेष:सत्तर वर्षापासून शास्त्रीय संगीताचा वारसा निरपेक्ष वृत्तीने जपणारा परळीतील "भक्ताश्रम"

इमेज
  सत्तर वर्षापासून शास्त्रीय संगीताचा वारसा निरपेक्ष वृत्तीने जपणारा परळीतील "भक्ताश्रम" प रळी वैजनाथ:       काशी येथील संगीत गंगोत्री मराठवाड्यातील परळी सारख्या गावात आणून संगीतक्षेत्रातील जाज्वल्य कार्य उभे करणारे परळीतील प्रतिष्ठित चौधरी घराण्यातील पं. गणेशअण्णा चौधरी यांनी 70 वर्षांपूर्वी परळीतील पहिले शास्त्रीय संगीत केंद्र निर्माण केले. आजतागायत हा संगीताचा वारसा निरपेक्ष वृत्तीने जपला गेला आहे. त्यांनीच स्थापन केलेल्या भक्ताश्रमाच्या माध्यमातून अभिजात संगीताचा हा वारसा सदोदित निरपेक्ष भाव दर्शवतो. हे देखील आवश्य वाचा: 🔵 आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष वृत्तकथा🔵 नौली, वामनौली, दक्षिणनौली या आवघड योगक्रिया लिलया करणारा परळीतील 'सहजयोगी': अॅड. श्रीनिवास मुंडे       शास्त्रीय संगीत कलेला लोकाश्रय देऊन त्या परंपरेचे जतन करणाररा परळीतील सर्वपरिचित असा लौकिक असणाऱ्या भक्ताश्रमने गेल्या ७०वर्षात जुन्या-नव्या कलावंतांचा समन्वय, सादरीकरण, संगीत मैफलींचे दस्तऐवजीकरण आणि प्रशिक्षणाद्वारे संगीतसेवा सुरू ठेवली. अभिजात कलेचा वारसा जपणाऱ्या या भक्ताश्रमातून आजतागायत हजारो संगीत

MB NEWS-सई कोल्हेचा स्नेही बचत गटाकडुन सत्कार

इमेज
  सई कोल्हेचा स्नेही बचत गटाकडुन सत्कार *परळी वै.ता.२० प्रतिनिधी*       परळी येथील सई वैजनाथराव कोल्हे या विद्यार्थीनीने इयत्ता दहावीच्या परिक्षेत ९९.२० टक्के गुण घेऊन विद्यावर्धीनी शाळेतुन प्रथम क्रमांकाने यश मिळविल्याबद्दल स्नेही बचत गटाकडुन सत्कार करण्यात आला. रविवारी (ता.१९) सायंकाळी सात वाजता शंकर पार्वती नगर येथील तिच्या निवासस्थानी जाऊन स्नेही बचत गटाचे सर्व सदस्यांनी सईचा फेटा बांधुन, पुष्पगुच्छ व पेढे देऊन  सत्कार केला. यात विशेष असे कि स्नेही बचत गटाचे सदस्य वैजनाथराव कोल्हे यांचे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दुःखद निधन झाले. सईने वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत हे दैदिप्यमान  यश संपादन केले.  प्रतिकुल परिस्थितीत कठोर परिश्रम व अत्यंत जिद्दीने सातत्याने अभ्यास करून तिने हे यश प्राप्त केले. मिळविलेल्या यशाबद्दल स्नेही बचत गटाच्या वतीने तिचे कौतुक  करून सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेही बचत गटाचे अध्यक्ष दादाराव सुर्यवंशी, सचिव अशोक जाधव, पांडुरंग आलापुरे, प्रकाश चव्हाण, आबासाहेब शिंदे, शरद घनचेकर, रमेश देशमुख,ओम वरवटकर, पांडुरंग यादव, सुनिल फुलारी उपस्थीत होते. गटाचे सचिव अशोक जाधव

MB NEWS-पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यावर काळाचा घाला ;वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

इमेज
  पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यावर काळाचा घाला ;वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            तालुक्यातील कनेरवाडी येथे शेतात पेरणी करून रासनीचे काम करणाऱ्या करणाऱ्या एका शेतकऱ्यावर अचानक काळाने घाला घातला आहे. आज दि.२० रोजी अंदाजे सायंकाळी 4.30 वा. सुमारास विजेचा कडकडाट झाला आणि अंगावर वीज कोसळून या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.                 याबाबत माहिती अशी की, कनेरवाडी ता. परळी वैजनाथ येथील रहिवासी शेतकरी माणिक बाबुराव मुंडे वय 42 वर्षे हे  शेतात पेरणीचे काम करत होते. पेरणी झाल्यानंतर रासनीचे काम करत असताना अचानक वारा कावधान व विजांचा कडकडाट सुरु झाला. अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दुर्दैवाने या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. महसूल प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करुन अहवाल सादर केला असल्याची माहिती तलाठी व्ही.एस.गित्ते यांनी दिली. 

MB NEWS-राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या परळी शहर अध्यक्षपदी प्रा. वर्षा दहीफळे

इमेज
  राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या परळी शहर अध्यक्षपदी प्रा. वर्षा  दहीफळे परळी वैजनाथ ,प्रतिनिधी....        राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या परळी शहर अध्यक्षपदी येथील प्रा. वर्षा उमाकांत दहीफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत नियुक्तीचे पत्र नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.          राष्ट्रवादी युवती काँग्रेस हा युवतींसाठी देशातील पहिला राजकीय मंच असून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित ,बजरंग सोनवणे, जिल्हाध्यक्षा सौ. विद्या जाधव यांच्या मान्यतेने परळी शहराध्यक्ष म्हणून प्रा. वर्षा उमाकांत दहिफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पक्ष बळकटीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कार्यरत राहू असा विश्वास नवनियुक्त शहराध्यक्ष प्रा. वर्षा दहिफळे यांनी व्यक्त केला आहे.

MB NEWS-आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त आयोजित पाच दिवशिय योग शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त आयोजित पाच दिवशिय योग शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद  परळी वैजनाथ:  आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त जिजामाता गार्डन हेल्थ क्लब परळी, पतंजली योग समिती परळी व वैद्यनाथ बँक परळी यांच्या संयुक्त विद्यमाने  21 जून रोजी योग दिन हा दिवस जिजामाता उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.  या दिनाचे औचित्य साधून नागरिकांसाठी 5 दिवसाचे योग शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे     यावेळी  योग शिक्षिका सरला उपाध्याय आसना मध्ये स्थिरता व सुख म्हणजे आनंद प्राप्त होण्यासाठी आसना चे प्रशिक्षण सुयोग्य गुरू च्या मार्गदर्शनाखाली होणे आवश्यक आहे. हाच विचार करुन जिजामाता गार्डन हेल्थ क्लब परळी व पतंजली योग समिती परळी व वैद्यनाथ बँक परळी ने 5 दिवसाचे शिबिर विनामूल्य आयोजित केले आहे. या शिबिराचा कालावधी 17 जून ते 21 जून हा असून प्रशिक्षण दररोज सकाळी 7. 00 वाजता जिजामाता उद्यान होत आहे या शिबिराचे समारोप (21 जून) योग दिनाच्या दिवशी सकाळी 7.00  वाजता होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योगोत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन योग दिन चा एक राष्ट्

MB NEWS-इनरव्हील क्लब ची नविन कार्यकारिणी जाहीर

इमेज
  इनरव्हील क्लब ची नविन कार्यकारिणी जाहीर                इनरव्हील क्लब अध्यक्षपदी सौ.‌उज्वला आलदे                                  परळी वैजनाथ, इनरव्हील क्लब  परळी ची नविन कार्यकारिणीची घोषणा  दि १९ जुनं रोजी करण्यात आली.          क्लबच्या नुतन अध्यक्षपदी  सौ.‌उज्वला अमर आलदे यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी नगरसेविका  सौ उमा समशेटे,यांची निवड करण्यात आली व  कोषाध्यक्ष सौ सारिका सोंळके,आय एस ओ विजया दहिवाळ इडिटर सॊ शुभांगी गित्ते सल्लागार सौ मधु कांकरिया यांचा नविन कार्यकारिणी मध्ये समावेश करण्यात आला, माजी अध्यक्षा सौ तारा अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणी तयार करण्यात आली.लवकरच पदग्रहण सोहळा पार पडणार आहे.

MB NEWS-परळी रेल्वे स्थानकात सुरक्षेच्या दृष्टीने 'करडी नजर'

इमेज
  परळी रेल्वे स्थानकात सुरक्षेच्या दृष्टीने 'करडी नजर' परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        अग्निपथ योजनेवरून देशात घडणार्‍या हिंसक आंदोलन घटनांच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी रेल्वे गाड्या व  रेल्वे स्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने परळी वैजनाथ रेल्वे स्थानकातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असल्याचे बघायला मिळाले आहे.          अग्नीपथ योजनेला विरोध करण्यासाठी म्हणून देशभरात विविध ठिकाणी निदर्शने आंदोलने केली जात आहेत. काही ठिकाणी या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानके व रेल्वे गाड्या यांना टार्गेट करून आंदोलनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांना पायबंद बसावा यासाठी उपाययोजना म्हणून रेल्वे स्थानके व रेल्वे गाड्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परळी वैजनाथ रेल्वे स्थानकात ही नेहमीपेक्षा सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकात गाड्या आल्यानंतर रेल्वे सुरक्षा व रेल्वे पोलिसांच्या वतीने गर्दीवर नजर ठेवल्या जात आहे. त्याचप्रमाणे रेल्वेस्थानकातील फिरणारे नागरिक व प्रवासी यांच्यावरही लक्ष ठेवले जात आहे. रेल्वे स्थानक परिसरात कायदा व

MB NEWS-शिवसेना वर्धापन दिना वृक्ष आमच्या संगोपन तुमचे या उपक्रमाने साजरा

इमेज
शिवसेना सामाजिक हिता साठी कार्य करणारी संघटना-अभयकुमार ठक्कर परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गाने व शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व युवासेना प्रमुख ना.आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सामाजिक हित साठी कार्य करणारी संघटना आहे असे मनोगत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार ठक्कर यांनी शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त शक्ती कुंज वसाहत  येथे वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले. परळी प्रभू वैद्यनाथांच्या भूमित शिवसेना वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या आरंभी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  त्या नंतर वड, पिंपळ, लिंब, उंबर चिंच, आवळा, बेल, करंज, सप्तपरणी अशा विविध प्रकारच्या 560 वृक्षाचे वृक्ष लागवडी साठी वृक्ष आमच्या संगोपन तुमचे या उपक्रमाची सुरुवात शक्ती

MB NEWS-मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ,समाज कल्याण च्या 77 निवासी शाळांची लक्षणीय कामगिरी, निकाल १०० टक्के

इमेज
मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ,समाज कल्याण च्या 77 निवासी शाळांची लक्षणीय कामगिरी, निकाल १०० टक्के -------------------------------------- मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन पुणे: राज्यात समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात  येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मुलां व मुलींच्या शासकीय निवासी शाळेमधील मागासवर्गीय  विद्यार्थ्यांनी दहावी मध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. राज्यात कार्यरत असलेल्या एकूण 90 चे निवासी पैकी 77 निवासी शाळांचा निकाल हा 100% लागला आहे. विद्यार्थ्यांच्या लक्षणीय कामगिरीबद्दल समाजातील सर्वच घटक आतून विभागाचे कौतुक करण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी देखील निवासी शाळेतून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर या सर्व शाळांमधून 90 टक्क्यांपेक्षा अधिक मार्क (गुण) मिळवणारे 119 विद्यार्थी आहेत हे विशेष. 90 निवासी शाळांपैकी  77 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे, 6 शाळांचा निकाल 95 टक्के लागला आहे, तर 4 निवासी शाळांचा निकाल 90 टक्के लागला

MB NEWS-वीज खंडित केली जाणार असल्याचा मॅसेज करून दीड लाख उकळले

इमेज
  वीज खंडित केली जाणार असल्याचा मॅसेज करून दीड लाख उकळले बीड : तुम्ही मागच्या महिन्याचे वीज बील भरलेले नाही. आज रात्री तुमची वीज खंडित केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी सोबतच्या क्रमांकावर संपर्क साधा, असा मेसेज पाठवून त्यावर संपर्क करण्यास वीज ग्राहकास सांगितले. त्यानंतर अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून वीज ग्राहकाच्या अकाऊंटमधून दीड लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार बीड शहरातील धोंडीपुरा भागात घडला. याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील धोंडीपुरा भागात राहणार्‍या धनंजय भास्कर डोंगरे (वय ५१) यांना १८ जून रोजी दुपारी १२ वाजता एका मोबाईल क्रमांकावरुन मेसेज आला. त्यामध्ये तुम्ही मागच्या महिन्याचे बील भरलेले नाही. त्यामुळे आज रात्री ९.३० वाजता तुमचा वीज पुरवठा खंडित  केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी सोबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे लिहीले होते. त्यावर विश्‍वास ठेवून धनंजय डोंगरे यांनी त्या क्रमांकावर संपर्क केला असता मी महावितरणचा अधिकारी बोलत असून तुम्ही टीम व्ह्युअर अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड करा, असे सांगितले. त्याचा पासवर्ड डोंगरे यांनी संबंधिताला सांगताच त्याच्याकडे मोबाईलचे अ‍ॅक्सेस गेले. त्

MB NEWS-दहावी बोर्ड परीक्षेत कु. रितिका चव्हाण चे घवघवित यश

इमेज
  दहावी बोर्ड परीक्षेत कु. रितिका चव्हाण चे घवघवित यश लातूर (प्रतिनिधी) येथील मनोज सहदेव अकॅडमी ची विद्यार्थिनी कु. रितिका प्रशांत चव्हाण हिने दहावी बोर्ड व इंग्रजी माध्यम परीक्षेतून 92 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादित केले आहे.            मनोज सहदेव अकॅडमीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत यशस्वी विद्यार्थ्यांपैकी कु. रितिका चव्हाण ने सदरील नेत्रदीपकीय यश संपादित केले आहे. तिच्या या यशा बद्दल सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज बांधवांकडून अभिनंदन होत आहे.

MB NEWS-साईप्रसाद दिलीप लड्डा यांचे दहावीच्या परीक्षेत 92.60 % गुण घेऊन यश

इमेज
  साईप्रसाद दिलीप लड्डा यांचे दहावीच्या परीक्षेत 92.60 % गुण घेऊन यश अबाजोगाई (प्रतिनिधी )    दहावी बोर्डाचा निकाल नुकताच लागला त्यामध्ये साने गुरुजी विद्यालय भावठाणा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील विद्यार्थी साईप्रसाद दिलीप लड्डा याने 92.60  टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.                         भावठाणा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील रहिवासी दिलीप लड्डा यांचा मुलगा चि. साईप्रसाद याने दहावी बोर्डाच्या परीक्षेत उतुंग यश संपादन केल्याबद्दल  साने गुरुजी विद्यालय भावठाणा  शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, नातेवाईक, मिञपरिवार तसेच नागरीकांनी त्याचे कौतुक करून अभीनंदन करण्यात येत आहे. या यशाचे श्रेय त्याने शाळेतील सर्व शिक्षकवृंद, आई-वडील, नातेवाईक व मिञपरिवार या सर्वांना दिले आहे. भविष्यात डाॅक्टर होऊन ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्याचा त्याचा मानस असल्याचे त्याने यावेळी बोलून दाखवले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

MB NEWS-परळीतील विद्यार्थ्याची संघर्षमय यशोगाथा: दुर्धर आजाराशी झुंज देत 'त्याने' मिळवले 'विशाल' यश !

इमेज
  परळीतील विद्यार्थ्याची संघर्षमय यशोगाथा: दुर्धर आजाराशी झुंज देत 'त्याने' मिळवले 'विशाल' यश ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....          नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. यात परळीमधिल एका विद्यार्थ्याचे  यश अनेक कारणांनी विशेष आणि महत्वाचं आहे. कारण हा मुलगा वयाच्या दुसऱ्या वर्षापासून आजतागायत आजारपणाशी झुंज देत आहे.   जीवघेणा आजार झालेला असतानाही आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर दहावीत या विद्यार्थ्याने ८६.७० टक्के गुण मिळवले. विशाल राजकुमार मुकदम या विद्यार्थ्याने अनेकांना प्रेरणा मिळेल असे यश मिळवत आपली  संघर्षमय यशोगाथा निर्माण केली आहे.त्याच्या या संघर्षमय यशोगाथेचे परळीत सर्व स्तरातून कौतुक होत आहे.          परळीतील विशाल राजकुमार मुकदम या विद्यार्थ्याने वयाच्या दुसऱ्या वर्षापासून नेफ्ट्रोटिक सिंड्रोम हा दुर्धर आजार झालेला असतानाही आपल्या शिक्षणाचा निर्धार पूर्ण केला आहे.त्याने दहावीचं संपूर्ण वर्ष दवाखान्यात उपचारात आणि आजाराच्या वेदनेतच निघून गेलं. तरीही जिद्द न सोडता घरीच अभ्यास सुरु ठेवला आणि ८६.७०  टक्के गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. परळी शहरातील सर्व परिचि

MB NEWS-परळीतील उड्डाणपूलावरील वाहतूक सुरळीत

इमेज
  परळीतील  उड्डाणपूलावरील वाहतूक सुरळीत  परळी वैजनाथ, प्रतिनिधी ..... डॉ.शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलावर दुपारी ४.१५ वा. झालेली वाहतूक कोंडी काही वेळानंतर खुली झाली आहे.बंद पडलेली बस काढण्यात आली आहे. Click: 🔸कृपया या लिंकवर क्लिक करा आणि MB NEWS चे युट्यूब चॅनल *सबस्क्राईब* करा.🙏🙏🙏     शहराचा मध्यवर्ती दुवा असलेल्या डाॅ. शामाप्रसाद मुखर्जीरेल्वेउड्डाणपुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे. आज दुपारी ४.१५च्या सुमारास पुन्हा एकदा वाहतुकीचा खोळंबा झाला होता हे चित्र दिसुन आले. निमुटपणे वाहतूक कोंडी विरुद्ध नेहमीचा संघर्ष नागरिक करताना दिसले. बंद पडलेल्या बसला दुरुस्त करून एसटी प्रशासनाने ही बस या ठिकाणांहून काढली.त्यानंतर वाहतूक पुन्हा पुर्वपदावर आली.त्यामुळे नागरीकांना काहीसे हायसे वाटले. संबंधित बातम्या:- •  क्लिक करा   🛑 *एसटी बस बिघडली अन् परळीच्या उड्डाणपूलावर पुन्हा"ट्राफिक जाम"* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._  •  🛑 *एसटी बस बिघडली; उड्डाण पुलावर वाहतुक खोळंबली*

MB NEWS-एसटी बस बिघडली;उड्डाण पुलावर वाहतुक खोळंबली

इमेज
  एसटी बस बिघडली;उड्डाण पुलावर वाहतुक खोळंबली परळी वैजनाथ :प्रतिनिधी....      शहराचा मध्यवर्ती दुवा असलेल्या डाॅ. शामाप्रसाद मुखर्जीरेल्वेउड्डाणपुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे. आज दुपारी ४.१५च्या सुमारास पुन्हा एकदा वाहतुकीचा खोळंबा झाला होता हे चित्र दिसुन आले. नेहमी दंडात्मक कारवाई च्या नावाखाली टोळक्या टोळक्याने दिसणारे तत्पर पोलीस बांधव पण आज कुठं गुंतले होते की ? त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास फारच अडथळे निर्माण झाले आहेत.नागरीकांना काही वाटले नाही फक्त नेहमीप्रमाणे कुचंबणा सहन करावी लागली इतकेच.निमुटपणे वाहतूक कोंडी विरुद्ध नेहमीचा संघर्ष नागरिक करताना दिसले.    Click: 🔸कृपया या लिंकवर क्लिक करा आणि MB NEWS चे युट्यूब चॅनल *सबस्क्राईब* करा.🙏🙏🙏   उड्डाणपूल, बसस्टँड रोडवर  उड्डाणपूलावर ट्राफिक जाम झाली.या ट्राफिक जाममुळे वाहनधारक यांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे कर्मचारी बराच वेळ दिसत नव्हते. वाहतूकदार चांगलेच खोळंबलेले होते. शहरातला उड्डाण पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने एखादे वाहन जरी बंद पड

MB NEWS-पंकजा मुंडे कुणाच्या बोलण्यावर काही निर्णय घेत नसतात - रावसाहेब दानवेंची टिप्पणी

इमेज
  पंकजा मुंडे कुणाच्या बोलण्यावर काही निर्णय घेत नसतात - रावसाहेब दानवेंची टिप्पणी   औरंगाबाद......  “पंकजा मुंडे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे भाजपाचे संस्थापक सदस्य होते. त्यामुळे पंकजा मुंडे कुणाच्याही बोलण्यावर काही निर्णय घेतील असं नाही. त्या पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस आहेत. पक्ष योग्य वेळी त्यांचा विचार करेल याची मला खात्री आहे,” असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. क्लिक करा व वाचा :  ⭕️ *सावधान:विजवितरण कंपनीच्या नावाने फसवे मेसेज* 🔸 *परळीतील एका नागरीकाला ४५ हजारांचा गंडा*       एआयएमआयचे  प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपातून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी असं केल्यास राज्याच्या राजकारणात भूकंप होईल, असं वक्तव्य केलं. यावर आता केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय. पंकजा मुंडे इम्तियाज जलील यांना प्रतिसाद देतील असं वाटत नाही, असं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्त

MB NEWS-दहावीचा निकाल जाहीर, 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही मुलींची बाजी

इमेज
  दहावीचा निकाल जाहीर, 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही मुलींची बाजी एमबी न्युज ऑनलाईन: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीमध्ये 97.96 टक्के मुली यावर्षी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण हे 96.06 टक्के इतकं आहे. परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के जास्त मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यंदा राज्यात 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाख 21 हजार 003 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात निकालाची सर्वाधिक टक्केवारी कोकण विभागाची आहे. कोकण विभागातील 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागातून 95.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घे

MB NEWS-एका क्लिकवर जाणुन घ्या दहावीचा निकाल

इमेज
  एका क्लिकवर जाणुन घ्या दहावीचा  निकाल  आपला निकाल पाहण्यासाठी खालील ओळींवर क्लिक करा व जाणुन घ्या दहावीचा निकाल:- •  👉 या ओळींवर क्लिक करा व आपला नि काल   किंवा •   👉 या ओळींवर क्लिक करा   व जाणून घ्या निकाल   maharesult.nic.In hscresult.mkcl.Org msbshse.co.in महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल आज (१७ जून २०२२) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. निकाल जाणून घ्या एका क्लिकवर. निकाल चेक करण्याआधी… सीट नंबर आणि आईचं नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत सीट नंबर काही कारणाने चुकला तर आईच्या नावाने रिझल्ट चेक करता येणार आहे आईचं नाव काही कारणानं चुकलं किंवा अजून काही गडबड झाली तरी सीट नंबरने सुद्धा रिझल्ट चेक करता येऊ शकेल. आपला निकाल पाहण्यासाठी खालील ओळींवर क्लिक करा व जाणुन घ्या दहावीचा निकाल:- •  👉 या ओळींवर क्लिक करा व आपला निकाल                                     किंवा •   👉 या ओळींवर क्लिक करा. आणखी लिंक.... maharesult.nic.In hscresult.mkcl.Org msbshse.co.in   ++++++++++±++++++++++±++++++++++++++

MB NEWS-⭕️ सावधान:विजवितरण कंपनीच्या नावाने फसवे मेसेज परळीतील एका नागरीकाला ४५ हजारांचा गंडा

इमेज
  ⭕️ सावधान:विजवितरण कंपनीच्या नावाने फसवे मेसेज परळीतील एका नागरीकाला ४५ हजारांचा गंडा परळी वैजनाथ, प्रतिनिधी...           अनोळखी क्रमांकावरून वीज ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यासाठी फसवे मॅसेज व्हॉट्सअप येत आहेत.वीज देयक भरणा व केवायसी अपडेट करण्यासाठी सदरील मॅसेज असून ग्राहकांनी याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन वीज वितरण कडून करण्यात येत आहे.दरम्यान परळी येथील शारदानगर मधिल रहिवासी एस.जी.स्वामी यांना अशाच प्रकारच्या फसवणूकीला सामोरे जावे लागले आहे.त्यांच्या खात्यातून तब्बल ४५ हजार रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला आहे.        वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्स अप वर तुमचा वीज कंज्युमर नंबर डिस्कनेक्ट केली जाईल जर तुमचा केवायसी आज रात्री 9.30 वा पर्यंत अपडेट केला गेला नाहीत तर तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाईल तसेच वीज कार्यालयातून आपले केवायसी अपडेट करणे बाकी आहे कारण तुमचे मागील महिन्याचे बिल अपडेट केले गेले नाही. कृपया आमच्या वीज अधिकारी 9123739692 शी त्वरित संपर्क साधावा या प्रकारचे संदेश प्राप्त होत असून विज ग्राहकांनी या नंबर वरून आलेल्या मॅसेजकडे दुर्लक्ष करून को

MB NEWS-किसान सभेच्या मागणीनुसार कृषी दुकानदार व शेतकरी प्रतिनिधींची तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

इमेज
  किसान सभेच्या मागणीनुसार कृषी दुकानदार व शेतकरी प्रतिनिधींची तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक परळी वै.ता.१६ प्रतिनिधी       किसान सभेच्या मागणीनुसार कृषी चे अधिकारी, कृषी सेवा केंद्राचे सर्व विक्रेते व शेतकरी प्रतिनिधींची बैठक बुधवारी (ता.१५) झाली. यात शेतकऱ्यांची अडवणुक करण्यात येउ नये या शेतकरी प्रतिनिधींच्या मागणीवर सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी दुकानदारांना  तंबी दिली.       अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळानी सोमवारी (ता.१३) तहसिलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देउन तालुक्यातील ठोक व किरकोळ बीयाणे व खत विक्रेते, कृषी अधिकारी व शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेण्याची मागणी केली होती. त्या निवेदनाची दखल घेउन बुधवारी (ता.१५) दुपारी चार वाजता परळी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत समितीचे अध्यक्ष तहसिलदार सुरेश शेजुळ, उपविभागीय कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर, सचिव गटविकास अधिकारी संजय केंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी शेषेराव कांदे, शेतकरी प्रतिनिधी म्हणुन किसान सभेचे कॉ अजय बुरांडे, कॉ पांडुरंग राठोड यांच्यास

MB NEWS-कार-मोटारसायकल अपघात: एक जण ठार

इमेज
  कार-मोटारसायकल अपघात: एक जण ठार  बीड : भरधाव कार व दुचाकीचा भीषण अपघात घडला आहे. यामध्ये दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना  बीड-परळी महामार्गावर मैंदा येथे घडली.  रविंद्र बळीराम चव्हाण ( वय २४ वर्ष ) रा. उतार तांडा मैंदा ( ता. बीड ) असे मयताचे नाव आहे. तो बीड कडून मैंदा येथे येत असताना वडवणी येथून येत असलेली स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम.एच. ०३ बी सी ०४५३ या भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने दुचाकीस्वार व दुचाकी दुर फेकले गेले. गंभीर मार लागून दुचाकीस्वार जागीच ठार झाला.  दुचाकी रस्त्याच्या खाली पडली होती. या अपघातानंतर जमाव संतप्त झाला. एकत्र येत बीड-परळी महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला. धडक दिलेल्या कारची जमावाने तोडफोड केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

MB NEWS-दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता

इमेज
  दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता पुणे:-दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली.  या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. हा निकाल 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता http://www.mahresult.nic.in या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.          ‌ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती https://t.co/g7ZbJdsffV या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.             गेल्या काही दिवसांपासून इयत्ता १० वीचा निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. अखेर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वीच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. त्यानुसार उद्या दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीनं इयत्ता १० वीचा निकाल जाहीर केला जाणार आह

MB NEWS-परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी धनंजय मुंडेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

इमेज
  परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी धनंजय मुंडेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट * * परळी अंबाजोगाई रस्त्याचे लोकार्पण व परळी ते सिरसाळा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी परळीला या - मुंडेंचे गडकरींना निमंत्रण * सर्वच मागण्यांबाबत सकारात्मक, जुलैमध्ये परळीला येणार - नितीन गडकरी नवी दिल्ली (दि. 16) - राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि. 16) नवी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांच्या विस्तारीकरण/अपग्रेडेशन, विविध पुलांची उभारणी आदी कामांना मंजुरी देण्याची मागणी केली असून, या सगळ्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द श्री. नितीन गडकरी यांनी दिला आहे. परळी ते बीड मार्गावरील परळी ते सिरसाळा हा टप्पा मंजूर असून पुढील टप्प्यात सिरसाळा ते तेलगाव व तेलगाव ते बीड हे दोन्हीही रस्ते सिमेंट काँक्रेटचे करून चौपदरीकरण करण्यात यावे, तसेच अंबाजोगाई ते लातूर दरम्यान बीड जिल्हा हद्दीतील दुह