परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-एसटी बस बिघडली;उड्डाण पुलावर वाहतुक खोळंबली

 एसटी बस बिघडली;उड्डाण पुलावर वाहतुक खोळंबली






परळी वैजनाथ :प्रतिनिधी....

     शहराचा मध्यवर्ती दुवा असलेल्या डाॅ. शामाप्रसाद मुखर्जीरेल्वेउड्डाणपुलावर सततची वाहतुक कोंडी हा नित्याचाच बनलेला विषय आहे. आज दुपारी ४.१५च्या सुमारास पुन्हा एकदा वाहतुकीचा खोळंबा झाला होता हे चित्र दिसुन आले. नेहमी दंडात्मक कारवाई च्या नावाखाली टोळक्या टोळक्याने दिसणारे तत्पर पोलीस बांधव पण आज कुठं गुंतले होते की ? त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास फारच अडथळे निर्माण झाले आहेत.नागरीकांना काही वाटले नाही फक्त नेहमीप्रमाणे कुचंबणा सहन करावी लागली इतकेच.निमुटपणे वाहतूक कोंडी विरुद्ध नेहमीचा संघर्ष नागरिक करताना दिसले.   


  उड्डाणपूल, बसस्टँड रोडवर  उड्डाणपूलावर ट्राफिक जाम झाली.या ट्राफिक जाममुळे वाहनधारक यांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे कर्मचारी बराच वेळ दिसत नव्हते. वाहतूकदार चांगलेच खोळंबलेले होते. शहरातला उड्डाण पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने एखादे वाहन जरी बंद पडले तरी त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो हे नेहमी अनुभवाला येणारे चित्र असते. उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे नागरिकांना, रस्त्यावरुन चालणे कठीण बनले.एक एसटी बस बिघडली असल्याने वाहतूक कोंडी झाली.दरम्यान बसची दुरुस्ती करून या ठिकाणांहून बस बाजुला घेण्याचा प्रयत्न एसटीचे मेकॅनिक करत आहेत.

Video news पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 
🛑 *एसटी बस बिघडली अन् परळीच्या उड्डाणपूलावर पुन्हा"ट्राफिक जाम"* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!