MB NEWS-पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यावर काळाचा घाला ;वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यावर काळाचा घाला ;वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
तालुक्यातील कनेरवाडी येथे शेतात पेरणी करून रासनीचे काम करणाऱ्या करणाऱ्या एका शेतकऱ्यावर अचानक काळाने घाला घातला आहे. आज दि.२० रोजी अंदाजे सायंकाळी 4.30 वा. सुमारास विजेचा कडकडाट झाला आणि अंगावर वीज कोसळून या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, कनेरवाडी ता. परळी वैजनाथ येथील रहिवासी शेतकरी माणिक बाबुराव मुंडे वय 42 वर्षे हे शेतात पेरणीचे काम करत होते. पेरणी झाल्यानंतर रासनीचे काम करत असताना अचानक वारा कावधान व विजांचा कडकडाट सुरु झाला. अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये दुर्दैवाने या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. महसूल प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करुन अहवाल सादर केला असल्याची माहिती तलाठी व्ही.एस.गित्ते यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा