MB NEWS-दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता

 दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता



पुणे:-दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली. 


या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. हा निकाल 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता http://www.mahresult.nic.in या वेबसाईटवर जाहीर होणार आहे. 


        ‌ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती https://t.co/g7ZbJdsffV या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


            गेल्या काही दिवसांपासून इयत्ता १० वीचा निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. अखेर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वीच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. त्यानुसार उद्या दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीनं इयत्ता १० वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार