MB NEWS-दहावीचा निकाल जाहीर, 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही मुलींची बाजी

 दहावीचा निकाल जाहीर, 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही मुलींची बाजी




एमबी न्युज ऑनलाईन: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


दहावीमध्ये 97.96 टक्के मुली यावर्षी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण हे 96.06 टक्के इतकं आहे. परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के जास्त मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.


यंदा राज्यात 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाख 21 हजार 003 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात निकालाची सर्वाधिक टक्केवारी कोकण विभागाची आहे. कोकण विभागातील 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागातून 95.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.



महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा घेण्यात आली नव्हती. पण यावर्षी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. राज्यात दहावीच्या परीक्षेसाठी 16,38, 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89, 506 मुलं असून मुलींची संख्या 7, 49, 458 एवढी आहे.


कुठे पाहाल निकाल?

maharesult.nic.In

hscresult.mkcl.Org

msbshse.co.in या संकेतस्थळावर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार