MB NEWS-पंकजा मुंडे कुणाच्या बोलण्यावर काही निर्णय घेत नसतात - रावसाहेब दानवेंची टिप्पणी

 पंकजा मुंडे कुणाच्या बोलण्यावर काही निर्णय घेत नसतात - रावसाहेब दानवेंची टिप्पणी 



 औरंगाबाद......  “पंकजा मुंडे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे भाजपाचे संस्थापक सदस्य होते. त्यामुळे पंकजा मुंडे कुणाच्याही बोलण्यावर काही निर्णय घेतील असं नाही. त्या पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस आहेत. पक्ष योग्य वेळी त्यांचा विचार करेल याची मला खात्री आहे,” असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

क्लिक करा व वाचा : ⭕️ *सावधान:विजवितरण कंपनीच्या नावाने फसवे मेसेज* 🔸 *परळीतील एका नागरीकाला ४५ हजारांचा गंडा*

      एआयएमआयचे  प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपातून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचं आवाहन केलं. तसेच त्यांनी असं केल्यास राज्याच्या राजकारणात भूकंप होईल, असं वक्तव्य केलं. यावर आता केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय. पंकजा मुंडे इम्तियाज जलील यांना प्रतिसाद देतील असं वाटत नाही, असं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते. ते म्हणाले, “राजकारणात दुसऱ्यात कसा खोडा घालता येईल असा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. इम्तियाज जलील म्हटल्यानंतर पंकजा मुंडे त्याला प्रतिसाद देतील असं नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार