MB NEWS-परळीतील विद्यार्थ्याची संघर्षमय यशोगाथा: दुर्धर आजाराशी झुंज देत 'त्याने' मिळवले 'विशाल' यश !

 परळीतील विद्यार्थ्याची संघर्षमय यशोगाथा: दुर्धर आजाराशी झुंज देत 'त्याने' मिळवले 'विशाल' यश !



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

         नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. यात परळीमधिल एका विद्यार्थ्याचे  यश अनेक कारणांनी विशेष आणि महत्वाचं आहे. कारण हा मुलगा वयाच्या दुसऱ्या वर्षापासून आजतागायत आजारपणाशी झुंज देत आहे.   जीवघेणा आजार झालेला असतानाही आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर दहावीत या विद्यार्थ्याने ८६.७० टक्के गुण मिळवले. विशाल राजकुमार मुकदम या विद्यार्थ्याने अनेकांना प्रेरणा मिळेल असे यश मिळवत आपली  संघर्षमय यशोगाथा निर्माण केली आहे.त्याच्या या संघर्षमय यशोगाथेचे परळीत सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

         परळीतील विशाल राजकुमार मुकदम या विद्यार्थ्याने वयाच्या दुसऱ्या वर्षापासून नेफ्ट्रोटिक सिंड्रोम हा दुर्धर आजार झालेला असतानाही आपल्या शिक्षणाचा निर्धार पूर्ण केला आहे.त्याने दहावीचं संपूर्ण वर्ष दवाखान्यात उपचारात आणि आजाराच्या वेदनेतच निघून गेलं. तरीही जिद्द न सोडता घरीच अभ्यास सुरु ठेवला आणि ८६.७०  टक्के गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. परळी शहरातील सर्व परिचित व्यावसायिक राजकुमार मुकादम यांचा विशाल हा मुलगा आहे.अभिनव विद्यालयात शिक्षण घेत त्याने दहावी परिक्षेत विशेष प्राविण्य मिळवले.यासाठी त्याचे पालक,अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.जिद्द व दुर्दम्य इच्छाशक्ती या जोरावर त्याने खडतर व संघर्षमय वाटचालीतही मिळवलेलं यश सर्वांना प्रेरणादायी ठरणारे आहे.

•  नेफ्रोटिक सिंड्रोम आजार नेमका काय असतो....

       जेव्हा प्रथिने जास्त प्रमाणात लघवीमध्ये जाऊ लागतात आणि शरीरात प्रथिनांची कमतरता असते तेव्हा त्याला नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणतात. हा एक किडनीचा आजार आहे, जो सामान्यतः लहान मुलांमध्ये दिसून येतो.  बहुतेक नेफ्रोटिक सिंड्रोम 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये होतो. डॉक्टरांच्या मते नेफ्रोटिक सिंड्रोममुळे पाय आणि घोट्याला सूज येते आणि इतर धोके वाढतात.नेफ्रोटिक सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या ओटीपोटात, चेहरा आणि डोळ्याभोवती सूज येते. उच्च रक्तदाबाची समस्याही यामध्ये दिसून येते. याशिवाय रुग्णाला भूक कमी लागते.हा दुर्धर आजार समजला जातो.या आजाराची बाधा,सततचे उपचार व रुग्णाची प्रकृती याचा विचार करता विशाल मुकादम या मुलाने जिद्द व इच्छाशक्तीच्या जोरावर घवघवीत शैक्षणिक यश संपादन करणे खरोखरच कौतुकास्पद व प्रेरक असल्याचे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.गुरुप्रसाद देशपांडे यांनी सांगितले.


विशालच्या चेहऱ्यावर आजारपणाच्या वेदना नाहीतर शिक्षणाचं समाधान.....

     १० वी च्या निकालानंतर विशालच्या चेहऱ्यावर आजारपणाच्या वेदना नाहीतर शिक्षणाचं समाधान भरभरून दिसुन येते.   त्याचे पालक सांगतात की, विशाल ला नेहमीच उपचारात रहावे लागते. शाळेतही तो नियमित जाउ शकत नाही.तरीही त्याने अभ्यास करणे सोडले नाही. त्याची शिक्षणाबद्दल ची जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्ती. नेहमीच आम्हाला जाणवते. त्याच्या या संघर्षमय वाटचालीत त्याचा दहावीचा हा घवघवीत निकाल पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे.

 • आजारांची बाधा तरीही उत्तुंग शैक्षणिक यश....

        दुर्दैवाने  आजाराची बाधा झाल्याने विशालला शिक्षणाची लढाई लढावी लागतली. मात्र,अशाही स्थितीत  या मुलाने आपल्या शिक्षणाचा निर्धार पूर्ण केला आहे.  चिकाटीने अभ्यास करत दहावीची परीक्षा विशेष प्राविण्य प्राप्त करत उत्तीर्ण केली.एवढ्या लहान वयात त्याला कितीतरी संकटांना तोंड द्यावं लागलं. या संकटांना तोंड देत या मुलाने यशाच्या शिखरावर आपली मजल मारत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.त्याने मिळवलेल्या यशामुळे  समाधान व्यक्त केलं जात आहे. सर्वच स्तरातून या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जात आहे.  या विद्यार्थ्यांने मिळवलेलं हे यश इतरांसाठी आदर्श असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

  1. पालकमंत्री मा.ना.धनुभाऊ मुंडे साहेबांनी या दुर्धर आजारावर उपचार करुन शिक्षणासाठी या विद्यार्थ्यांस दत्तक घेतले तर उद्याचा कलेक्टर राहील आपल्या या सखोल विश्लेषणात्मक लिखाणातून दिसते.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार