इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-विश्व संगीत दिवस विशेष:सत्तर वर्षापासून शास्त्रीय संगीताचा वारसा निरपेक्ष वृत्तीने जपणारा परळीतील "भक्ताश्रम"

 सत्तर वर्षापासून शास्त्रीय संगीताचा वारसा निरपेक्ष वृत्तीने जपणारा परळीतील "भक्ताश्रम"



रळी वैजनाथ:
      काशी येथील संगीत गंगोत्री मराठवाड्यातील परळी सारख्या गावात आणून संगीतक्षेत्रातील जाज्वल्य कार्य उभे करणारे परळीतील प्रतिष्ठित चौधरी घराण्यातील पं. गणेशअण्णा चौधरी यांनी 70 वर्षांपूर्वी परळीतील पहिले शास्त्रीय संगीत केंद्र निर्माण केले. आजतागायत हा संगीताचा वारसा निरपेक्ष वृत्तीने जपला गेला आहे. त्यांनीच स्थापन केलेल्या भक्ताश्रमाच्या माध्यमातून अभिजात संगीताचा हा वारसा सदोदित निरपेक्ष भाव दर्शवतो.


      शास्त्रीय संगीत कलेला लोकाश्रय देऊन त्या परंपरेचे जतन करणाररा परळीतील सर्वपरिचित असा लौकिक असणाऱ्या भक्ताश्रमने गेल्या ७०वर्षात जुन्या-नव्या कलावंतांचा समन्वय, सादरीकरण, संगीत मैफलींचे दस्तऐवजीकरण आणि प्रशिक्षणाद्वारे संगीतसेवा सुरू ठेवली. अभिजात कलेचा वारसा जपणाऱ्या या भक्ताश्रमातून आजतागायत हजारो संगीतज्ञ निर्माण झाले आहेत.पं.गणेशअण्णा चौधरी यांच्या पुढाकाराने १९६० मध्ये विदेही संगितालय या संगीत केंद्राची स्थापना झाली.  चौधरी घराण्यातील सर्वांनी नि:स्वार्थी वृत्तीने आजपर्यंत योगदान दिल्याने संगीतसेवेचा हा वारसा गेल्या ७० वर्षापासून अविरत सुरू आहे. भक्ताश्रमाच्या या जुन्या वास्तूने  देशातील नामवंत गायक-वादकांच्या संगीत आविष्काराचे साक्षीदार होण्याचे भाग्य प्राप्त केले आहे. या विद्यालयात हजारो विद्यार्थी तज्ज्ञ शिक्षकांकडून हार्मोनियम, गायन, तबला, बासरी तसेच संगीताच्या विविध पैलूंचे शिक्षण घेऊन संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. 
हे देखील आवश्य वाचा:

    परळी वैजनाथ येथील जुन्या भागात गणेश पार परिसरात गोराराम मंदिराच्या शेजारी भक्त आश्रम कार्यरत आहे. या भक्ता आश्रमात गेल्या 70 वर्षांपासून संगीत सेवा प्रचार व प्रसार अविरतपणे सुरू आहे. विदेही संगीतालय या नावाने सन 1960 सली स्वर्गीय पं. गणेश अण्णा चौधरी यांनी परळीतील पहिले संगीत परीक्षा केंद्र सुरू केले. भक्त आश्रमात प्रथमच प्रयाग संगीत समितीचे  परीक्षा केंद्र म्हणजे परळी शहराला प्रथमच शास्त्रीय संगीताचा परिचय करून देणारे अधिकृत केंद्र ठरले. गेल्या 70 वर्षापासून चौधरी परिवारात हा वारसा निरपेक्ष वृत्तीने जपला गेला आहे. त्याचप्रमाणे आकाशवाणी केंद्रावरील व महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबलावादक स्वर्गीय पं सतीशचंद्र चौधरी यांची जडणघडण ही याच भक्त आश्रमात झाली. आपल्या वडिलांचा वारसा त्यांनी पुढे नेटाने चालवला. आजही त्यांच्या पुढील पिढीतील सर्वजण संगीत क्षेत्रात कार्यरत असून मराठवाड्यातील विविध संगीत शिक्षण प्रेमींना संगीताचे अभिजात शिक्षण देण्याचे उज्वल कार्य ते करताना दिसत आहेत. कला ,संगीत या क्षेत्रात परळीचा भक्त आश्रम हा मराठवाड्यातील एकमेवाद्वितीय आहे.



      प्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी वसंतराव देशपांडे श्री नाकोडा यांना संगीत मैत्रीमध्ये उत्तम संगीत साथ देणारे तबलावादक पंडित सतीशचन्द्र चौधरी यांनी भक्त आश्रमाच्या माध्यमातून परळी व औरंगाबाद येथे संगीत सेवेचा वारसा सातत्याने यशोशिखरावर नेला त्याचप्रमाणे डॉक्टर्स लावण्यवती चौधरी पाटील व चौधरी परिवारातील अन्य सर्व सदस्यांनी ही संगीताची सेवा आजतागायत सुरू ठेवले आहे खऱ्या अर्थाने भक्त आश्रम म्हणजे परळीतील संगीत प्रेमींचे माहेरघर ठरले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!