MB NEWS-⭕️ सावधान:विजवितरण कंपनीच्या नावाने फसवे मेसेज परळीतील एका नागरीकाला ४५ हजारांचा गंडा

 ⭕️ सावधान:विजवितरण कंपनीच्या नावाने फसवे मेसेज



परळीतील एका नागरीकाला ४५ हजारांचा गंडा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी... 

         अनोळखी क्रमांकावरून वीज ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यासाठी फसवे मॅसेज व्हॉट्सअप येत आहेत.वीज देयक भरणा व केवायसी अपडेट करण्यासाठी सदरील मॅसेज असून ग्राहकांनी याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन वीज वितरण कडून करण्यात येत आहे.दरम्यान परळी येथील शारदानगर मधिल रहिवासी एस.जी.स्वामी यांना अशाच प्रकारच्या फसवणूकीला सामोरे जावे लागले आहे.त्यांच्या खात्यातून तब्बल ४५ हजार रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला आहे.


       वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्स अप वर तुमचा वीज कंज्युमर नंबर डिस्कनेक्ट केली जाईल जर तुमचा केवायसी आज रात्री 9.30 वा पर्यंत अपडेट केला गेला नाहीत तर तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाईल तसेच वीज कार्यालयातून आपले केवायसी अपडेट करणे बाकी आहे कारण तुमचे मागील महिन्याचे बिल अपडेट केले गेले नाही. कृपया आमच्या वीज अधिकारी 9123739692 शी त्वरित संपर्क साधावा या प्रकारचे संदेश प्राप्त होत असून विज ग्राहकांनी या नंबर वरून आलेल्या मॅसेजकडे दुर्लक्ष करून कोणतीही खाजगी माहिती इतरांना देऊ नये असे आवाहन वीज वितरण कंपनी कडून करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार