MB NEWS-सई कोल्हेचा स्नेही बचत गटाकडुन सत्कार

 सई कोल्हेचा स्नेही बचत गटाकडुन सत्कार



*परळी वै.ता.२० प्रतिनिधी*


      परळी येथील सई वैजनाथराव कोल्हे या विद्यार्थीनीने इयत्ता दहावीच्या परिक्षेत ९९.२० टक्के गुण घेऊन विद्यावर्धीनी शाळेतुन प्रथम क्रमांकाने यश मिळविल्याबद्दल स्नेही बचत गटाकडुन सत्कार करण्यात आला. रविवारी (ता.१९) सायंकाळी सात वाजता शंकर पार्वती नगर येथील तिच्या निवासस्थानी जाऊन स्नेही बचत गटाचे सर्व सदस्यांनी सईचा फेटा बांधुन, पुष्पगुच्छ व पेढे देऊन 

सत्कार केला. यात विशेष असे कि स्नेही बचत गटाचे सदस्य वैजनाथराव कोल्हे यांचे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दुःखद निधन झाले. सईने वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत हे दैदिप्यमान  यश संपादन केले.  प्रतिकुल परिस्थितीत कठोर परिश्रम व अत्यंत जिद्दीने सातत्याने अभ्यास करून तिने हे यश प्राप्त केले. मिळविलेल्या यशाबद्दल स्नेही बचत गटाच्या वतीने तिचे कौतुक  करून सत्कार करण्यात आला. यावेळी स्नेही बचत गटाचे अध्यक्ष दादाराव सुर्यवंशी, सचिव अशोक जाधव, पांडुरंग आलापुरे, प्रकाश चव्हाण, आबासाहेब शिंदे, शरद घनचेकर, रमेश देशमुख,ओम वरवटकर, पांडुरंग यादव, सुनिल फुलारी उपस्थीत होते. गटाचे सचिव अशोक जाधव यांनी मनोगत व्यक्त करतांना सई कोल्हे हिने भविष्यात असेच यश संपादन करून वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी  बचत गटाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !