MB NEWS-किसान सभेच्या मागणीनुसार कृषी दुकानदार व शेतकरी प्रतिनिधींची तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

 किसान सभेच्या मागणीनुसार कृषी दुकानदार व शेतकरी प्रतिनिधींची तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक




परळी वै.ता.१६ प्रतिनिधी

      किसान सभेच्या मागणीनुसार कृषी चे अधिकारी, कृषी सेवा केंद्राचे सर्व विक्रेते व शेतकरी प्रतिनिधींची बैठक बुधवारी (ता.१५) झाली. यात शेतकऱ्यांची अडवणुक करण्यात येउ नये या शेतकरी प्रतिनिधींच्या मागणीवर सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी दुकानदारांना  तंबी दिली.


      अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळानी सोमवारी (ता.१३) तहसिलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देउन तालुक्यातील ठोक व किरकोळ बीयाणे व खत विक्रेते, कृषी अधिकारी व शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेण्याची मागणी केली होती. त्या निवेदनाची दखल घेउन बुधवारी (ता.१५) दुपारी चार वाजता परळी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत समितीचे अध्यक्ष तहसिलदार सुरेश शेजुळ, उपविभागीय कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर, सचिव गटविकास अधिकारी संजय केंद्रे, तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी शेषेराव कांदे, शेतकरी प्रतिनिधी म्हणुन किसान सभेचे कॉ अजय बुरांडे, कॉ पांडुरंग राठोड यांच्यासह तालुक्यातील सुमारे सत्तर कृषी सेवा केंद्राचे मालक सहभागी झाले होते. या बैठकीत तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थीक लुट होत असल्याचा मुद्दा शेतकरी प्रतिनिधींनी उपस्थीत केला. यावर प्रशासनानी तात्काळ उपाययोजना करावी, शेतकऱ्यांना मागणी नुसार बीयाणे व खत पुरवठा करावा, लिंकींग पध्दत बंद करावी, महिको बीयाणे कंपनी सुरू ठेवण्याबाबत कृषी विभागानी मागणी करावी, शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या विरूध्द कारवाई करावी या मागण्या करण्यात आल्या. यावर कृषी विभागाचे कृषी दुकानांवर लक्ष असुन कुठे साठेबाजी व शेतकऱ्यांची फसवणुक होत असल्यास प्रशासनाच कळवावे. कृषी विभाग तात्काळ कारवाई करेल. कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बाजुने कायम राहील अशी ग्वाही यावेळी दिली तसेच. कृषी दुकानदारांनी त्यांच्याकडे उपलब्ध बियाणे व खताचा कंपनीच्या नावासह शिल्लक साठा दर्शनी भागात बोर्डावर लिहुन लावावा असे आदेश दिले आहेत. किसान सभेच्या मागणीनुसार घेण्यात आलेली बैठक सुमारे दोन तास चालली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !