इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त आयोजित पाच दिवशिय योग शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त आयोजित पाच दिवशिय योग शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद 



परळी वैजनाथ:

 आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त जिजामाता गार्डन हेल्थ क्लब परळी, पतंजली योग समिती परळी व वैद्यनाथ बँक परळी यांच्या संयुक्त विद्यमाने  21 जून रोजी योग दिन हा दिवस जिजामाता उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.  या दिनाचे औचित्य साधून नागरिकांसाठी 5 दिवसाचे योग शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे   


 यावेळी  योग शिक्षिका सरला उपाध्याय आसना मध्ये स्थिरता व सुख म्हणजे आनंद प्राप्त होण्यासाठी आसना चे प्रशिक्षण सुयोग्य गुरू च्या मार्गदर्शनाखाली होणे आवश्यक आहे. हाच विचार करुन जिजामाता गार्डन हेल्थ क्लब परळी व पतंजली योग समिती परळी व वैद्यनाथ बँक परळी ने 5 दिवसाचे शिबिर विनामूल्य आयोजित केले आहे. या शिबिराचा कालावधी 17 जून ते 21 जून हा असून प्रशिक्षण दररोज सकाळी 7. 00 वाजता जिजामाता उद्यान होत आहे

या शिबिराचे समारोप (21 जून) योग दिनाच्या दिवशी सकाळी 7.00  वाजता होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योगोत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन योग दिन चा एक राष्ट्रीय कार्यक्रम संपन्न करण्याचा आनंद घ्यावा. . 

या शिबिरा साठी  जिजामाता गार्डन हेल्थ क्लब परळी चे अध्यक्ष ब्रिजलाल मुंदडा, सचिव चंद्रकांत मुंडे, व पतंजली योग समिती परळी चे अध्यक्षा सौ. सरला  उपाध्याय, सौ उमाताई समशेटी, शालिनी बोधे, छाया बुरांडे, पल्लवी हजारे ,प्रा चव्हाण ,प्रा आर्य,विवेक आघाव हे मार्गदर्शन करीत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!