MB NEWS-विधान परिषद निवडणूक: भाजपाच विजेता !

 विधान परिषद निवडणूक: भाजपाच विजेता !



   राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, सोमवारी झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत झाली. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली.  या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता लागलेली होती. 

हे देखील आवश्य वाचा:🔴 विश्व संगीत दिवस विशेष वृत्तकथा 🔵 सत्तर वर्षापासून शास्त्रीय संगीताचा वारसा निरपेक्ष वृत्तीने जपणारा परळीतील "भक्ताश्रम"_

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात होते. विधानसभेतील एक जागा रिक्त तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही. विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर झाला.यामध्ये भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

         हे देखील आवश्य वाचा:🔵 आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष वृत्तकथा🔵 नौली, वामनौली, दक्षिणनौली या आवघड योगक्रिया लिलया करणारा परळीतील 'सहजयोगी': अॅड. श्रीनिवास मुंडे

विधान परिषदेचे विजयी उमेदवार…

राष्ट्रवादी काँग्रेस -रामराजे नाईक निंबाळकर (२९ मते ), एकनाथ खडसे (२८ मते)

शिवसेना – सचिन अहिर (२६ मते), आमशा पाडवी (२६ मते)

भारतीय जनता पार्टी– प्रवीण दरेकर (२९ मते), श्रीकांत भारतीय (३० मते), राम शिंदे (३० मते), उमा खापरे (२७ मते), प्रसाद लाड (२८ मते)

काँग्रेस -भाई जगताप (२६ मते), चंद्रकांत हंडोरे (पराभूत – २२ मते)


हे देखील आवश्य वाचा:पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यावर काळाचा घाला ;वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू


भाजपाचे प्रसाद लाड विजयी; काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत

विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरस होणार होती. मात्र दोन्ही उमेदवार निवडून आले असून काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी – रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे विजयी झाले.शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी- सचिन अहिर, आमशा पाडवी विजयी झाले.भाजपाचे विजयी उमेदवार- प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे, प्रसाद लाड विजयी झाले.

                    -----------------------------

हे देखील आवश्य वाचा:पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यावर काळाचा घाला ;वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !